क्राईम डायरी

सरसम गावातील अनेक रणरागिणी दारुबंदीसाठी धडकल्या पोलीस स्टेशनवर…  मुख्य संपादक /एस.के चांद यांची बातमी 

सरसम गावातील अनेक रणरागिणी दारुबंदीसाठी धडकल्या पोलीस स्टेशनवर…

 

मुख्य संपादक /एस.के चांद यांची बातमी

 

 

हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागातील खेड्या पाड्यांमध्ये अवैध देशीदारु सर्रासपणे हिमायतनगर शहरातुन आणुन विक्री केली जातअसून,यामुळे गोरगरिबांच्या घराचा खेळखंडोबा होतानाचे चित्र उघड्या डोळ्यांनी गावांसह तालुक्यात पाहायला मिळतआहे.याच धरतीवर मौजे सरसम बुद्रुक येथील गाव वासियांनी आपल्या गावातील अवैध देशीदारु विक्री बंद व्हावी यासाठी हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक २९ऑक्टोबर २०२२रोजी भव्य विराट आक्रोश मोर्चा काढून दारूबंदी साठी निवेदन देण्यात आलेआहे.असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या.मौजे सरसम बुद्रुक गाववासीयां मार्फत गावातील अवैध देशीदारू बंद व्हावी,या संबंधी निवेदन हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे देण्यातआलेआहे.यावेळी निवेदन स्वीकारताना पोलिस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन हे उपस्थित होते.सरसम बुद्रुक इंदिरानगर,कोतलवाडी येथे मोठ्या प्रमाणात अवैध देशीदारूची विक्री सर्रासपणे दिवसा-रात्री चालूआहे. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात शांतता भंग होऊन दूषित वातावरण नाची निर्मिती होत आहे गावात अवैद्य देशीदारू विक्री होतअसल्यामुळे गावातील महिलां,मुलींना याचा मोठ्या प्रमाणात दारू पिणाऱ्यां लोकांकडून त्रास होतआहे.तसेच मौजे सरसम बुद्रुक येथे कै.श्रीधरराव देशमुख महाविद्यालयात बाहेर गावातुन शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना दारुड्या लोकांचाअतोनात त्रास होतआहे.या कारणास्तव सर्व बाबींचा विचार करून गावातील अवैध देशीदारू बंद करावी,अन्यथा समस्त गांवकरी मंडळींस बेमुदत आमरण उपोषण करावे लागेल,असे समस्त मौजे सरसम,इंदिरानगर व कोतलवाडी गांववासीयांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलेआहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांच्या आदेशाने पुढील कार्यवाहीसाठी बीट जमादार श्रीमती कोमल कागणे मॅडम यांच्याकडेसोपवण्यातआलेआहे. यावेळी सरपंच प्रतिनिधी ठाकूर सर, एडवोकेट अतुल वानखेडे उपसरपंच, प्रताप मिराशे,विकास वानखेडे,राजरतन वाठोरे,रामेश्वर वानखेडे,दिनेश गिरी,अतुल बिच्चेवार, कौशलाबाई नरवाडे,सुरेखा शिंदे,चंद्रकला वाठोरे,पद्मिनबाई देवराये,यांच्यासह अनेक महिलावर्ग,युवावर्ग सरसम येथील गांवकरी मोठया संख्येनी यावेळी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *