जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार
भा.म.महासघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर
————————————-
एटीएम धारकांच्या खात्यात पैसे आले पण हातात मात्र येणार का नाही? कारण एटीएम चालतच नाही*शासनाने दिलेले शेतकऱ्याचे अनुदान बँकेमध्ये येऊन जवळपास वीस बावीस दिवस झाले असून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत असून ह्या बँकेचे गराणे बाप घरला येऊ देत नाही माय जेवायला वाढणार नाही असे प्रकार नांदेड जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे आज परिस्थिती चालू आहे बँक मॅनेजर म्हणतात की आम्ही सर्वांना एटीएम दिले तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकता आम्ही कॅश बँकेतून देणार नाही मग शेतकऱ्यांनी आलेले अनुदान उचलायचे कसे दिवाळी करायची का नाही बऱ्याच शेतकऱ्याच्या घरी आज दिपवाळी निमित्त गोड गोड करण्याची परिस्थिती सुद्धा राहिलेली नसून बँक वाल्यांनी सर्व शेतकऱ्यांना अति संकटात टाकल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे तरी याकडे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माननीय माजी आमदार वसंतरावजी पाटील चव्हाण नायगावकर यांनी लक्ष देऊन नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश तात्काळ देऊन त्यांना कॅश पेमेंट बँकेत सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावे असे सूचना देऊन सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिपवाळी गोड करण्यात यावी असे भारतीय मराठा महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष यांनी आपले म्हणणे व्यक्त केले आहे