ताज्या घडामोडी

खडकी फाटा येथे मोटारसायकल व कार चा भीषण अपघात

खडकी फाटा येथे मोटारसायकल व कार चा भीषण अपघात

??खडकी येथील गजानन सूर्यवंशी गंभीर जखमी..

मुख्यसंपादक / एस.के चांद यांची बातमी

हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा अपघात होण्याचे प्रमुख केंद्र बनत चालले आहे या राष्ट्रीय महामार्गावर दररोज एक ना एक अपघात होत आहेत मागील तीन दिवसांपूर्वी शहरातील एका नवतरुण व्यवसायिकाचा अपघातात जीव गेल्यानंतर दि 10 ऑक्टोंबर रोजी सायकाळी खडकी फाटा येथे एक किरकोळ अपघात झाला त्यानंतर आज सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान किनवट कडून येणाऱ्या एका कारणे खडकी फाटा येथील शेतकरी गजानन सूर्यवंशी या युवकास मोटारसायकलवर येत असताना जोराची धडक दिली त्यात तो गंभीर जखमी झाला आहे

त्यामुळे हिमायतनगर येथील ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांनी प्रसंगवधान लक्षात घेता जखमी असलेल्या युवकास त्यांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ पाठून त्यांचावर उपचार करण्यास सांगितले त्यानंतर तो शेतकरी गंभीर जखमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यामुळे पुढील उपचारासाठी नांदेड येथे त्यांना पाठविण्यात आले असल्याचे ठाकरे यांनी सांगितले

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *