महागांव/ पोहंडूळ ते ईजनी नाल्यावर पुलाची मागणी : आमदार नामदेव ससाने यांच्या कडून रस्त्याची पाहणी
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
गावातील नागरिक व शेतकऱ्यांनी पोहंडूळ ते ईजनी नाल्यावर पुलाची केली मागणी गावकऱ्यांनी आमदार नामदेव ससाणे यांना चांगलीच गळ घातली अखेर आमदार ससाने यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन नाल्याची पाहणी केली. या नाल्यावर पुलाची नितांत गरज असून फुल नसल्यामुळे दोन गावाचा संपर्क तुटलेला आहे. ईजनी येथून पोहंडूळ येथे शाळेत येणारे विद्यार्थी विद्यार्थ्यांना दरवर्षी पावसाळ्यात नाल्याच्या पाण्यामुळे शिक्षण बंद झाले आहे. तसेच या रस्त्यावरील दोन्ही गावच्या शेतकऱ्यांचे शेती असल्यामुळे दोन्ही गावच्या लोकांना पुलाची नितांत आवश्यकता भासू लागली आहे.
दोन्ही गावच्या सरपंच यांनी आमदार नामदेव ससाणे यांना विनंती करून नाल्यावरील फुल किती आवश्यक आहे याची प्रत्यक्ष पाहणी करायला लावले. आमदार ससाणे यांनी दोन्ही गावच्या नागरिकाच्या भावना लक्षात घेता घटनास्थळाची पाहणी करून तातडीने पुलाचे काम मार्गी लावणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी आमदार ससाणे यांनी जिल्हा परिषदेचे उप अभियंता यांना या कामाची पाहणी करून कोणत्या योजनेमध्ये हा पूल बसवता येते याची खातरजमा करण्यास सांगितले आहे.
आमदार नामदेव ससाने यांच्या समवेत तालुका अध्यक्ष दीपक आडे , तीवरंग च्या सरपंच जयश्री राठोड,पोहंडूळ सरपंच दिनेश रावते, किशोर सोळंके,क्षोन रावते आणि सुनील रावते पाटील उपस्थित होते.