उमरखेड / बिटरगाव ( बु ) चे ग्रामविकास अधिकारी निलंबित,
प्रतिनिधी बिटरगाव ( बु ) तालुक्यातील बिटरगाव बु. येथील ग्राम विकास अधीकारी प्रकाश लक्ष्मण भेदेकर यांचे विरुद्ध गावातील ग्रा.प. सदस्य तथा गावातील नागरीकांच्या अनेक तक्रारी होत्या त्या अनुषंगाने त्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही व ग्रामपंचायतचे अभिलेखे उपलब्ध करून दिले नाही म्हणुन त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे निलंबन केले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बिटरगाव बु. ग्रामपंचायत अनेक कारणांनी मागील काही दिवसांपासुन चर्चेत आहे त्यात वनसमीती आणी समीतीचा कारभार यामुळेही ग्रामपंचायत प्रकाश झोतात आली आहे. ग्रामपंचायत सदस्य व नागरीकांनी केलेल्या तक्रारी साठी आलेल्या चौकशी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतचे अभिलेखे उपलब्ध करून न देने आणी चौकशीला पुर्वसुचना न देता गैरहजर राहणे यामुळे त्यांचे विरुद्ध विस्तार अधिकारी पंचायत यांनी १ ते ४ चा प्रस्ताव तयार करून पंचायत समीती मार्फत जिल्हा परीषदेला पाठवीला यावरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम विकास अधिकारी प्रकाश लक्ष्मण भेदेकर यांचे निलंबन केले आहे तर निलंबन कालावधीमध्ये त्यांचे मुख्यालय हे महागाव पंचायत समिती असेल असे आदेशात नमूद केले आहे
चौकट –
चौकशीत सहकार्य केले नाही व तक्रारीची कागदपत्रे चौकशी अधिकाऱ्यांना व्यवस्थित रित्या न दिल्यामुळे व चौकशीला गैरहजर राहिल्यामुळे पंचायत समिती उमरखेडने एक ते चार चा प्रस्ताव जिल्हा परिषद कडे पाठवला त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही करून ग्रामविकास अधिकारी भेदेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली
– प्रवीणकुमार वानखेडे
गटविकास अधिकारी पं.स. उमरखेड
चौकट –
उमरखेड पंचायत समितीने चौकशी अहवाल वेळेत जिल्हा परिषदेला न पाठवल्यामुळेच संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याचे निलंबन झाले आहे त्यामुळे उमरखेड तालुका ग्रामसेवक संघटना या बाबीचा विरोध दर्शवित आहे व यापुढे ग्रामसेवक संघटना याबाबत सदर ग्रामविकास अधिकाऱ्याला सर्व प्रकारचे सहकार्य करणार आहे
– अध्यक्ष सचिव ग्रामसेवक संघटना पंचायत समिती उमरखेड