यवतमाळ/ महागांव काँग्रेस कमिटीची भारत जोडो यात्रा विश्राम गृहावर बैठक
प्रतिनिधी /एस. के.शब्बीर यांची बातमी
भारत जोडो यात्रेत आदरणीय राहुलजी गांधी यांनी सुरू केलेली यात्रा हिंगोली जिल्ह्यातून पहिले पाऊल उचलणार तर या अनुषंगाने भारत जोडो यात्रेत सामील होण्याकरिता आणि नियोजन निमित्ता महागाव तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विश्राम गृह बैठक पार पाडवी असून या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष. सचिन जी नाईक. तसेच उमरखेड महागाव विधानसभेचे लोकप्रिय मा. आमदार विजयराव खडसे साहेब. तालुक्याचे ज्येष्ठ नेते संभाजी दादा नरवाडे. यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस तथा महागाव नगरपंचायत चे नगरसेवक शैलेश कोपरकर. जिल्हा अध्यक्ष काँग्रेस चे महेंद्र कावळे साहेब ( अनुसूचित जाती सेल) स्वप्निल नाईक. डॉ. अरुण पाटील सह तालुक्यातील पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्त्यांना संवाद साधताना महागांव विश्राम गृहावर या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सचिन जी नाईक यांनी भेट देऊन आदरणीय राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रा या विषयावर काँग्रेस पदाधिकाऱ्यांना भारत जोडो यात्रा विषयावर चर्चा करून ही बैठक आज पार पडली