उमरखेड/ब्राम्हणगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
उमरखेड शहर प्रतिनिधी/अन्नपूर्णा बनसोड
उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच शांतीचा संदेश देणारे विश्वशांती गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून गावामध्ये मिरवणुकीला प्रस्थान करण्यात आले गावातील मेन रोड वरून संपूर्ण गावाला वेडा देऊन डीजेच्या तालावर बाबासाहेबांच्या गाण्यावर भीम वातावरणात सर्व बौद्ध बांधवांनी व इतर समाजातील नवतरुण तरुणांनी मोठा सहभाग नोंद दिला होता मिरवणुकीमध्ये लहान अबाल वृद्ध थोर तरुण मंडळी तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये धम्मचक्र प्रवर्तन मिरवणुकीमध्ये उपस्थित होते,
महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोषाने ब्राम्हगाव वासी बुद्धमय वातावरण निर्माण झाले होते गावामधून संपूर्ण मिरवणूक काढल्यानंत बौद्ध विहार समोर सत्कार रुपी कार्यक्रम घेण्यात आला व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये पोलीस पाटील सुनील देवसरकर तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव निमलवाड पत्रकार भारत वाठोरे सुरेश वाठोरे कैलास वाठोरे युवराज वाठोरे अमोल वाठोरे अमोल संजय वाठोरे दीपक वाठोरे विकास वाठोरे अंबादास मारुती वाठोरे पुंजाराम वाठोरे श्रावण काकडे सुरज काकडे तसेच गावातील बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,