ताज्या घडामोडी

महागाव/खडका आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

महागाव/खडका मंगळवार आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 महागाव प्रतिनिधी / लतीफ शेख

 

महागाव : महागाव तालुक्यातील मौजे खडका येथे दि./ 27/09/2022 वार.मंगळवार रोजी /स्थळ: राजीव गांधी भवन/ महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रशांत नाईक (उपविभागीय कृषी अधिकारी पुसद) हे होते, सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र सावंगी रेल्वे ता.दारव्हा येथील प्रमुख मार्गदर्शक डॉ.विपुल वाघ व श्री.अक्षय इंजाळकर या शास्त्रज्ञांनी उपस्थित राहून कापूस पिकातील गुलाबी बोंडआळी नियंत्रण, तूर व रब्बी हंगामातील पिकांचे कीड रोग नियंत्रण यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.पंजाबराव देशमुख खडकेकर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. तालुका कृषी अधिकारी महागाव श्री.विजय मुकाडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली सोबतच उपस्थित शेतकऱ्यांच्या सकारात्मक दृष्टिकोन व जीवन शैली उंचावण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले. पशुसंवर्धन विभागाचे प्रतिनिधी डॉ.यवतीकर व डॉ.गरुड यांनी सद्यस्थितीत जनावरांमध्ये आढळून येत असलेल्या लंपी आजाराबद्दल लक्षणे व त्यावरील उपयोजना आणि जनावरांची घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पुसद तालुक्यातील वेणी येथील श्री.रविंद्र सुभाष पुंड प्रगतशील शेतकरी यांनी शेतकऱ्यांना यांचे अनुभव कथन करत शासनाकडून घेत असलेल्या योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास व उन्नती कशाप्रकारे होते याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत ए.एस.वाघमारे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची सविस्तर माहिती दिली. परसबाग,पोषण युक्त अन्न, कामगंध सापळे,फवारणी करतांना वापरावयाची सुरक्षा किट व सुरक्षित फवारणी याबाबत मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री.एस.ए.पाटील व श्री.पी.जी.बैनवाड यांनी केले. सदर कार्यक्रमात फवारणी सुरक्षा कीट, कामगंध सापळे व भाजीपाला किट वाटप करण्यात आले. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ.नाईक साहेब यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी व संलग्न विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तसेच उत्पादित मालावर मूल्यवर्धन, प्रक्रिया करून शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ करावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ.संदीप शिंदे यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार कृषी मित्र श्री.दत्तराव कदम यांनी मानले.

सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी श्री.के.एस.राठोड, श्री.पी.एम.नंद्कुळे, श्री.आशिष मोघे जिल्हा समनवयक सुरक्षित फवारणी अभियान,डॉ.राजेंद्र पुरोहित, श्री.संदीप कानडे सरपंच, श्री.सचिन लेनगुळे तलाठी, श्री.एम.के.पुंडे सचिव, तालुका शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष श्री.गणेश चेलमेलवार,डॉ.सुरेश रोहणकर तसेच कृषी विभागाचे सर्व कर्मचारी,परिसरातील सर्व कृषी मित्र, गावातील शेतकरी बांधव, महिला शेतकरी व महिला बचत गट हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.दत्तराव कदम, श्री.योगेश ठाकरे श्री.दीपक भामकर, श्री.दशरथ मारटकर,श्री.विलास देशमुख, लतिफ शेख, माधव मारटकर व सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *