क्राईम डायरी

पोलीस स्टेशन बिटरगांव ची उल्लेखनिय कामगीरी घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.

पोलीस स्टेशन बिटरगांव ची उल्लेखनिय कामगीरी घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराना ठोकल्या बेडया.

 

 

महाराष्ट्रा चीफ /एस के चांद यांची बातमी

 

बिटरगाव पोलीस स्टेशन हद्वीत मागील काही दिवसापासुन घरफोडीच्या गुन्हयामध्ये वाढ झाली मुळे सदर चे गुन्हे उघडकीय आणण्यासाठी पोलीस स्टेशन बिटरगांव चे अधिकारी / अमलदार हे कसोसीने गुन्हे उघडकीस आणने बबात वरीष्ठांणी सुचना दिल्या होत्या. त्या अनुसंगाने पोलीस स्टेशन बिटरगांव ये ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस व त्यांचा स्टॉफ हे वरीष्ठांणी दिलेल्या सुचने प्रमाणे घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणण्या करीता कसोसीने प्रयत्न करीत होते.

 

दि.२७/०९/२०२२ रोजी शेख शबिर शेख हनिफ वय ३५ वर्ष रा. बिटरगाव यांचे घरी दि.२७/०९/२०२२ रोजी चे रात्री ०१/०० वा घराचा कोंडा तोडुन सात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करूण रॉड व कु-हाडीने वार करून जीव घेणा हल्ला करूण फिर्यादीला जखमी केले तसेच घरातील दागदागीने व माझ्या पत्नीच्या गळयातील असा एकुण ५४,०००/ रू चा मुददेमाल बळजबरीने हीसकावुन घेवुन पळुन गेले. तसेच बिटरगावातील राजु गुलाबराव देवकते यांचे १५०० / रू. शेख सुफीया शे. मुसा यांचे गुळयातील सोन्याची पोत अंदाजे ३५०००/रू, संजय गंगाराम बुटले यांचे १०००/रू व हनुमान मंदीर येथील दानपेटी फोडुन ३०००/रू असे एकुन ९४,५००/ रु मददेमाल जबरीने चोरून नेले तसेच वनविभाग जेवली रोड येथे कर्तव्यावर हजर असलेले वनविभागाचे कर्मचारी राजु देवकते यांचेवर दगडफेक करून यांचे सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला व सरकारी वनविभागाचे पोस्टची तोडफोड करून सरकारी मालत्तेचे ५०,००० / रू चे नुकसान केले आहे. ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस यानी लागलीच माहीती वरीष्ठांणा देवुन त्यांचे स्टॉफ सह बिटरगांव येथे येवुन लागलीच पोलीस स्टेशन बिटरगांव येथील स्टॉफ यांची गांजेगाव पुल व पिपळगाव पुल येथे नाकाबंदी लावण्यात आली. व सापळा रचण्यात आला. घरफोडी कराणारे ७ इसम हे घरफोडी करून पैदल येताना पिपळगाव पुल येथे दिसताच दबा धरून बसलेल्या पोलीसानी त्यांचेवर झडप टाकली. त्यामधील इसमा कडे कु-हाड, चाकु, लोंखडी रॉड व दगड होते. त्यानी पोलीसावर हमला करण्याचा प्रयत्न केला असता पोलीसानी हमला चुकवुन ५ ते ७ आरोपी मधील ३ आरोपीना बिटरगाव व पिपळगाव येथील पोलीस मित्र यांचे मदतिने जागीच पकडले व ४ आरोपी हे पळुण गेले. पळुन गेलेल्या आरोपी शोध कामी दोन पथके नेमुण एक पथक गांजेगावकडे व एक पथक जेवली पिपळागावं येथे रवाना केले. गांजेगावकडील पथकानी गांजेगाव येथील पोलीस मित्र यांचे मदतीने दोन आरोपी पकडले. त्या आरोपीचे नावे पुढील प्रमाणे

 

१) जाकी बावाजी चव्हाण वय २८ वर्षे रा. सोनारी ता. हीमायतनगर जि. नांदेड

 

२) मांगीलाल श्रीरंग राठोड वय ३८ वर्षे रा. हीमायतनगर जि.नांदेड ३) विकास श्रीरंग राठोड वय २२ वर्षे रा. हीमायतनगर जि. नांदेड

 

४) निलेश गब्बरसीगं राठोड वय २२ वर्षे रा हदगाव जि.नांदेड ५) दत्ता मांगीलाल राठोड वय ३० वर्षे रा. गणेशवाडी ता. हीमायतनगर जि.नांदेड वरील १ ते ५ आरोपी यांचेकडुन गुन्हयात वापरलेले ०३ चाकु, १ रॉड, ०१ कु-हाड, दोन मोबाईल किमंत २०००० रू गुन्हयात चोरी गेलेल्या मालापैकी २२ तोळच्या चांदीचे गटन किमंत २०००० रू १ जोडवे किमंत २००० रू व ७ ग्राम सोन्याचा गळातील हार असा एकुण ७७००० रु चा माल हस्तगत करण्यात आला आहे.

 

वरील प्रमाणे आरोपीना ताब्यात घेवुन दरोडा सारखा गंभीर गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्हात चोरी गेलेला मुद्देमाल ९५५०० पैकी ७७००० रू चा मुद्देमाल हस्तगत करून वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली उल्लेखनिय कामगीरी केली आहे.

 

सदर ची कार्यवाही मा. दिपील पाटील भुजबळ पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा.खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, मा.प्रदिप पाडावी उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शामध्ये पोलीस स्टेशन बिटरगांव चे ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस,पोउपनि कपील म्हस्के, पोना मोहन चाटे, अतिष जारंडे, गजानन खरात, रवि गिते मपोना विध्या राठोड, पोकों दत्ता कुसराम, सतिष चव्हाण, निलेश भालेराव, स्वप्नील रायवाडे चालक फिरोजी काझी महो चंद्रमणी वाढवे यानी कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नसताना याओगदर घडलेल्या घरफाडी, चोरी करून आरोपी पळुन जाण्याच्या पध्दतीचा व शैलीचा अचुक माग काढुण पिपळगाव पुलावर दबा धरून बसुन सापळा रचुन सर्व आरोपी याना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकावर चोर चालून येवुन प्रतिकार केला. पोलीसानी सिनेस्टाईल पाठलाग करून ३ आरोपी पिपळगाव पुलावरून व दोन आरोपी गांजेगाव येथील पोलीस मित्राचे साहयाने ताब्यात ४ तासाचे आत ताब्यात घेतले. बिरगांव पोलीसानी कौश्यल्यपूर्वक तपास करून उल्लेखनिय कामगीरी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास वरीष्ठांचे मार्गदर्शनामध्ये पोउपनि कपील म्हस्के करत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *