भोकर येथे अंगणवाडी केंद्रात पाककृती स्पर्धा घेण्यात आली.
भोकर ( प्रतिनधी ) येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प ३ नांदेड अंतर्गत शासनाच्या वतीने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत पोषण महा अभियान चालू असून अंगणवाडी केंद्र क्रं.९सईदनगर भाग २ मध्ये क्रांतिज्योती सावित्री माई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करुण पाककृती स्पर्धा घेण्यात आली . सदरील पाककृती स्पर्धा ही बालविकास प्रकल्प अधिकारी मिलींद वाघमारे, मुख्य सेविका अर्चना शेट्टे यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली असून अंगणवाडी क्र. ४ जि.प.केंद्रीय प्रा. शाळा भोकर, अंगणवाडी क्रं. ५ पवार कॉलनी भोकर येथिल स्तना माता, व इतर महिलांनी मोठया प्रमाणात पाककृति स्पर्धत सहभाग नोंदऊन विविध प्रकारचे पोष्टीक रूचकर पदार्थ बनवण्यात आले. सर्वानी पदार्थांचा अस्वाद घेऊन स्पर्धा उत्साहात घेण्यात आली . अंगणवाडी सेविकांनी पोष्टीक अहाराचे महत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांना समजाऊन सांगितले . यावेळी अंगणवाडी सेविका नफिसा शे. नजीर , तक्षशिला हिरे, अरूणा इनामदार, मदननीस द्रोपदा राजरपल्ले, मालनबाई जाधव , मिनाक्षी पोलावार यांनी खुप परिश्रम घेऊन पाककृती स्पर्धा यशस्वी केली.