राजकारण

प्रसादनगरची जामीन विक्री करण्यास प्रहारचा विरोध -आप्पासाहेब ढूस,

प्रसादनगरची जामीन विक्री करण्यास प्रहारचा विरोध -आप्पासाहेब ढूस,

 

 

अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी/

 

देवळाली प्रवरा – दि. 24 सप्टेंबर

डॉक्टर बा.बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे व सभासदांचे देणे देण्यासाठी कारखान्याची जमीन विक्री करून पैसा उभारणार असल्याचे वृत्तपत्रातून समजले.. त्या विक्री होणाऱ्या जमिनीचे गट नंबर पैकी प्रसादनगर वसाहतीचा गट नंबर 542 ही जमीन विक्री यादीत असल्याचे वाचनात आलेने प्रसादनगरची विक्री करण्यास प्रहारचा विरोध असून त्या ऐवजी दुसरे क्षेत्र विकावे असे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी डॉ तनपुरे कारखण्याला दिलेल्या निवदनात म्हंटले आहे.

प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब ढूस यांचे समवेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या राहुरी फॅक्टरी महिला शहर अध्यक्ष रजनीताई कांबळे, उपाध्यक्ष लैलाताई शेख, उपाध्यक्ष गणेश भालके, शाखा अध्यक्ष अमोल साळवे, सकाहरी पुंड, अभिलाष कांबळे, मालती कदम, बाबासाहेब कणसे, मारुती खंडागळे, लक्ष्मी पंडित, लता घुले , शोभा संसारे, जनाबाई सकट, सलीम शेख, अलका लवंडे, योगेश शेलार, वसंत पंडित, उत्तम पंडित, दिपाली सोनवणे, लीना कांबळे, यश शेलार, अभिलाष सरोदे आदी प्रसाद नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. उपस्थित सर्वांचे वतीने आप्पासाहेब ढूस यांचे कडून कारखान्याचे ऑफिस सुप्रीटेंडेंट निमसे साहेब यांनी निवेदन स्वीकारले..

निवेदनात ढुस यांनी म्हटले आहे की, राहुरी फॅक्टरी हद्दीमध्ये असलेल्या गट नंबर 542 मध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून मागासवर्गीय बहुल झोपडपट्टी धारकांचे वास्तव्य आहे. त्या ठिकाणी त्यांची पक्की घरे, रस्ते आणि गटारीसाठी शासनाचा कोट्यावधी रुपयांचा वेळोवेळी निधी खर्च झालेला आहे. तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेने त्या वसाहतीला संरक्षित झोपडपट्टी घोषित केलेली असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ रहिवास असलेल्या नागरिकांना तेथील जागा त्यांच्या नावे करून देणे बंधनकारक असल्याने डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याने सभासद व कामगारांची देणी देणे साठी विक्री करावयाच्या गट नंबर मधून प्रसाद नगरला वगळण्यात यावे.

पुढे बोलताना ढूस म्हणाले की, बाकी मालमत्ता विक्रीसाठी आमचा विरोध नाही.. प्रसाद नगरच्या जागेपेक्षा जास्त किंमतीच्या इतर जागा कारखाना परिसरात उपलब्ध आहेत. त्या पर्यायी जागेचा कारखान्याने विचार करावा..त्या जागा विकायच्या असतील तर जरूर विकाव्यात.. परंतु प्रसादनगर येथील दलित वस्तीला हटवून त्यांचे संसार उध्वस्त करू नये.. उलट पक्षी कारखान्याने प्रसाद नगरचा गट क्रमांक 542 मधील रहिवाशांच्या जागा त्यांच्या कायम नावावर करून देण्यासाठी महसूल प्रशासनाला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशीही विनंती आप्पासाहेब ढूस यांनी निवेदनात केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *