महागाव/सटवई अंबोडा येथील अवैध धंदे बंद करा… सामाजिक कार्यकर्ते यांची मागणी
महाराष्ट्रा मेंबर /एस के शब्बीर यांची बातमी
महागाव/ सटवाई अंबोडा येथे अवैध दारू धंदे विक्रेत्यांनी डोकेवर काढले. असून नवीन युवा पिढी व शाळेत विद्यार्थी सुद्धा दारूच्या व्यसनाधीन होत आहे. अंबोडा येथे मटका जुगार मोहका हातभट्टी राजरोषपणे जोमाने सुरू असल्याने अंबोडा गावांमधील कित्येक दिवसापासून हातभट्टी दारू चालू आहे.यांच्यावर कारवाई होईल का.. असे सुजाण नागरिकांतून बोलले जात आहे.
महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध दारू गेल्या काही दिवसापूर्वी महागाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विलास चव्हाण साहेब व दबंग ए.पी.आय. बालाजी शेंगफल्लू यांच्या पथकाने महागांव शहारासह तालुक्यातील राजुरा बिजोरा दगड थर मुडाणा करंजखेड सवना काळी टेंभी अशा अनेक गावामध्ये अवैध देशी दारु हातभट्टी मोहा विक्रेत्यावर धडाकेबाज छापे मारून महाराष्ट्र दारू बंदी कायद्याअनुसार कारवाई करून अवैध दारू विक्रेत्यांच्या मुस्क्या आवळल्या होत्या. महागाव शहराला ए. पी.आय. बालाजी शेंगफल्लू यांनी दबंग गिरी दाखवून महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यावर रोज करणाऱ्याच्या मुस्क्या आवळल्या होत्या महागाव पोलीस स्टेशनला अवैध धंद्याला रोख लावण्यासाठी नवीन पिढी युवकाचा बचाव करतील का असे सुजाण नागरिकांतून बोलले जात आहे. पी आय महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास चव्हाण साहेब यांच्यावर महागांव तालुक्यातील सर्व नागरिकांचे विश्वास आणि त्यांच्या दबंग पोलीस होण्याचे कौतुक आणि त्यांच्या मोठेपणाचे लोकांमधून वर्षाव करीत दिसून आले होते. विलास चव्हाण साहेब यांची रिटायरमेंट येणाऱ्या 30 /9/2022 ला रिटायरमेंट ची महागाव पोलीस स्टेशनला अखेरची सलामी देऊन रिटायरमेंट होणार आहेत महागाव पोलीस स्टेशनला टेम्परवारी पी.आय. पांडुरंग फाडे. दिनांक २५/९/२२ पर्यंत महागाव पोलीस स्टेशन पोलीस प्रशासन सांभाळत आहे. दिनांक 26/ 9 /2022 पासून अखेरच्या 30/ 9/ 2022 पर्यंत दारूबंदी कायद्यानुसार दारू विक्रेत्यांच्या मुस्क्या ठाणेदार विलास चव्हाण आवळतील का असे सुद्धा नागरिकांतून बोलले जात आहे.
आता त्याच नागरिकांमधून अंबोडा येथील अवेध दारू विक्रेत्यावर कारवाई करतील का.. पुन्हा एकदा या गावातील दारू बंद होईल का.. असे प्रश्न गावातील चोहाट्यावर बसून बोलले जात आहे.
या दारूच्या व्यसनीमुळे गावातील अनेक घरांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गी आले आहे. या अवैध दारूच्या व्यसनीमुळे नवीन पिढी युवक या मार्गाचा शिकार होत आहे वळलेले दिसून येत असल्याने. गावातील नागरिक रोज सायंकाळी आपले काम करून आपल्या घरी येणे आयोजि दारू अड्डयाकडेची वाट वळून दिसून येतात दारू पिऊन आपल्या घराकडे येत असताना रस्त्यामध्ये ये-जा करणाऱ्या लोकांना लोकप्रति निधी नागरिकांना त्रास व शिवीगाळ करून भांडणाचे वातावरण निर्माण करतात आणि आपल्या घरी पोहोचल्यानंतर बायको ला रठ लावून बसतात की तो वक्ती मला भांडण का केले असे त्याचीच रट लावत घरात आपल्या परिवारामध्ये पत्नी सह बाळांना मारहाण करून त्यांचे खाण्यापिण्याचे जीवनावश्यक वस्तू फेकून धिंगाणे आणि बायकोला मारणे लेकराना मारणे असे वातावरण निर्माण करून आपले जीवन वस विशीत करून घेतात. त्यामुळे आता गावातील चव्हाट्यावर बसून सुजान नागरिकांतून चर्चा महागाव पोलीस स्टेशनचे ठाणदार विलास चव्हाण हे या अवैध दारू विक्रेत्यांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अनुसार कारवाई करून मुस्क्या आवळतील का.. असे बोलले जात आहे.