हिमायतनगर तालुक्यात चालु असलेले अवैध धंदे बंद करा.लहुजी शक्ती सेना तालुक अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड.
महाराष्ट्र चीफ /एस के चांद यांची बातमी
तालुक्यात चालु असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे यासाठी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांनी पोलिस निरीक्षक भुसनुर साहेब यांना निवेदन देऊन सादर केले आहे,हिमायतनगर तालुक्यात अवैध रित्या देशी दारू विक्री केली जात असल्याचे स्पष्ट केले जात आहे,नवीन युवा पिढी व शालेय विद्यार्थी सुद्धा दारूच्या व्यसनाधीन होत आहे,व हिमायतनगर शहरात पोलिस स्टेशनला लागुनच मटका राज रोष पणे जोमाने सुरू आहे,शहरातील चौपाटी येथे पोस्ट ऑफिस च्या बाजूला अनेक कित्येक दिवसांपासून मटका चालू असतो,नवीन पोलिस निरीक्षक आले असून सुद्धा दारूच्या व मटका गुटख्याची विक्री सुरूच आहेत,या विविध अवैध रित्या धंद्याचे निवेदन दिले असता पोलिस निरीक्षक साहेब म्हणतात अवैध धंदे जोमत चालू आहेत ते आम्हाला माहितच नव्हतं तुच आम्हाला माहिती करुण दिलं,असे उडवा उडवीचे उत्तर दिलं जात आहे या सर्व अवैध रित्या धंदे सुरू असण्या मागे पोलिस प्रशासनाचा हात असल्याचा दावा लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांनी केला आहे,येत्या काही दिवसांत सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे अन्यथा तालुक्यात संघटनेच्या वतीने आंदोलने करण्यात येईल असा इशारा राजुभाऊ गायकवाड यांनी निवेदना द्वारे दिला आहे.