हदगांव/ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र यावे…शिवाजी जाधव हरडपकर.
महाराष्ट्र चीफ एस के चांद यांची बातमी
हदगाव तालुक्यात असलेल्या सुभाष शुगर कारखाना येथे मागील काही दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की हादगाव पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सुभाष सुगर कारखान्यावर मागील काही दिवसापासून शेतकऱ्याच्या वतीने उसाच्या वाढीव भावासाठी आंदोलन चालू आहे. या आंदोलनामध्ये अनेक संघटना, पक्ष, राजकीय नेत्यांनी आंदोलन स्थळे येऊन आपली भूमिका मांडली आहे. आणि शेतकऱ्याच्या घामाला दाम मिळाला पाहिजे अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्याची असलेली आपणास दिसून येते. या आंदोलनामध्ये बोलत असताना शिवाजी जाधव हरडफकर यांनी सर्व शेतकरी आणि गटतटाचे राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावे अशी आपली भूमिका ठामपणे मांडलेली आहे.