बाल विकास प्रकल्प नांदेडने भोकर येथे अनिमिया कॅम्प द्वारे महिलांची सि.बी.सी.तपासणी केली
महाराष्ट्रा चीफ एस के चांद यांची बातमी
भोकर शहरातील महमद नगर भागातील अंगणवाडी केंद्र क्रं.६ येथे एकात्मीक बाल विकास नागरी प्रकल्प क्र. ३ नांदेडने दि. १६ सप्टेंबर २०२२ रोजी अॅनिमिया कॅम्प आयोजित करून शहरातील महिलांची सी.बी.सी. तपासनी करण्यात आली. भोकर शहरातील पवार कॉलनी , अशोक कॉलनी नुतन शाळा परिसर, शनि मंदीर परिसर , सईदनगर परिसर भाग २,चिखलवाडी, शनि मंदीर परिसर अदि भागातील अंगणवाडी केंद्रा अंतर्गत महिलांनी अॅनिमिया कॅम्पचा लाभ घेतला व अरोग्य तपासणी केली. हा कॅम्प एकात्मीक बाल् विकास नागरी प्रकल्पाचे अधिकारी मिलिंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून मुख्य सेविका अर्चना शेट्टे यांनी सदरिल कॅम्प द्वारे उपस्थित महिलांना रक्ताक्षय रोगाची कारणे त्याची लक्षणे, त्यावरील उपचार व आहार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी भोकर ग्रामिण रूग्नालयाचे अरोग्य कर्मचारी राठोड, पवार यांनी महिलांची सि.बी.सी. ( CBC) तपासणी केली. या कॅम्प प्रसंगि अंगणवाडी सेविका, अरूणा इनामदार, राजश्री चालीकवार,ललीता ताटे,तक्षशिला हिरे, शे. नफीस शेख नजिर, कौशल्या बिजमवार मदतनिस अरूणा वैष्णव, संजीवनी पांचाळ, मालनबाई जाधव, राजरपल्ले, कात्रेबाई आदिनी परिश्रम घेऊन कॅम्प यशस्वी केला.