अर्धापूर एम. आय. एम. पक्षाचे वार्ड क्र. 14 चे नगरसेविकेची उच्च न्यायालयात केले दावा दाखल
प्रतिनिधी/खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्र. 14 हे एस. सी. समाजाच्या महिलेसाठी राखीव असुन सदर वार्डातुन एम. आय. एम. पक्षाचे उमेदवार निवडुण आले आहे. अर्धापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता असुन शासनामार्फत अर्धापूर शहरामधील एस. सी. आरक्षीत वार्डामध्ये विविध विकास कामासाठी निधी मंजुर झाली आहे. परंतु नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली वार्ड क्र. 14 मध्ये एम. आय. एम. पक्षाचे उमेदवार निवडणुक आलेले असल्याकारणाने सदर वार्डात जाणुन बुजून निधी देत नाही. वार्ड क्र. 14 हे एस. सी. समाजासाठी आरक्षित वार्ड असुन सुध्दा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली नगरपंचायतचे मुख्याधिकारी म्हणतात की सदर वार्ड एस. सी. समाजासाठी आरक्षित नाही. त्याउलट जे वार्ड अनुसूचित जातीसाठी आरक्षित नाही त्या वार्डामध्ये आरक्षित वार्डाचे निधी टाकण्यात आलेले आहे. त्यामुळे वार्ड क्र.14 चे उमेदवार रोहिणी सत्ताजी इंगोले यांनी त्यांच्या वार्डातील अनुसूचित जातीच्या व इतर समाजातील लोकांना न्याय मिळवुन देण्यासाठी व वार्डाच्या विकासासाठी व तसेच होणाऱ्या अन्यायाविरूध्द उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद येथे याचिका रिट पिटीशन क्र.WPST/ 23686/2022 दिनांक : 07.09.2022 रोजी दाखल करून वार्डातील लोकांसाठी न्याय मागितले आहे.