महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच.
महागांव : लतिफ शेख यांची बातमी
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील खडका गावाचे सर्व गावकरी आपले सर्व सन एकत्र येऊन साजरे करतात या गावातील तरूण वर्ग व गावकरी मंडळ दरवर्षी गणेश उत्सव साजर करतात या गावातील परंपरा एक गाव एक गणपती गेल्या 36 वर्षे पासुन सुरु आहे ती परंपरा आजही 37 व्या वर्षात खडका या गावात परंपरा कायम ठेवली आहे खडका शिवशक्ती गणेश मंडळ कडुन गणेश उत्सवाच्या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला जातो
यावर्षी शिवशक्ती गणेश मंडळ चे
अध्यक्ष: श्रीकांत जिल्लरवार व
उपाध्यक्ष: लतिफ शेख तसेच
आशिष भामकर, निरंजन बोखारे, सचिन भामकर, गोपाल देशमुख, नितीन भामकर, ओमकार बागल, अश्विन सुरोशे, आदित्य ठाकरे, कृष्णा ठाकरे एकुण मंडळी आहेत. अशा प्रकारे खडका गावातुन सामाजिक भावनेतून संघटीत व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश या माध्यमातून जनतेसमोर मांडले