ताज्या घडामोडी

वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकळा

वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकळा

 

प्रतिनिधी/ सुभाष वाघाडे

 

 

महागांव पुसद उमरखेड सर्वपक्षीय राजकीय नेते, कामगार व ऊस उत्पादकांच्या प्रयत्नाला यश! जिल्हा मध्यवर्ती बँक, व प्रॉव्हिडंट फंड तथा कामगारात समाधानकारक समजोता

वसंत सहकारी साखर कारखाना वसतनगर पोफाळी तालुका उमरखेड संचालक मंडळाने केलेल्या मनमानी कारभारामुळे प्रचंड प्रमाणात गैर कारभार व अनियमितता झाल्यामुळे कारखाना डबघाईस येऊनअखेर बंद पडला

मागील चार वर्षापासून वसंत सहकारी साखर कारखाना काही वर्ष बंद होता व आजही बंद आहे कामगार व ऊस उत्पादकांनी एकत्र येऊन वसंत बचाव संघर्ष समितीची स्थापना केली व वसंत सहकारी साखर कारखाना विक्री करण्यात येऊ नये तो भाडेतत्त्वावर देण्यात यावा यासाठी सतत पाठपुरावा केला कारखाना भाडे तत्त्वावर देण्यासाठी दोन टेंडर प्रशासक महंत यांच्या काळात निघाले होते परंतु काही राजकारणी लोकांनी अडचणी आणल्यामुळे त्यावेळी भाड्याने जाऊ शकला नाही त्यानंतरही कामगार ऊस उत्पादकांची लढाई चालू होती सुरेश मंहत यांची बदली करण्यात आली त्यांचे जागी अवसायक म्हणून श्री गोतरकर विशेष लेखा परीक्षक वर्ग एक यवतमाळ यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी कारखाना सुरू करण्यासाठी अतोनात मेहनत घेतली माननीय साखर आयुक्त माननीय सहकार मंत्री व माननीय प्रादेशिक सहसंचालक जिल्हा मध्यवर्ती बँक प्रॉव्हिडंट फंड कमिशनर यांच्यासोबत अनेक बैठका झाल्यात परंतु मार्ग निघू शकला नाही

कारण जिल्हा मध्यवर्ती बँकेने माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे याचिका दाखल करून कारखाना विक्रीस परवानगी द्यावी अशी मागणी केली होती त्यावर विलास चव्हाण व पि डि देशमुख यांच्या नेतृत्वात 50 कर्मचारी ग्रॅज्युटीची रक्कम आम्हाला दिल्याशिवाय बँकेला कोणतीही ऑर्डर देऊ नका म्हणून इंटर विनर म्हणून 50 कामगार एडवोकेट कैलास नरवाडे यांच्यामार्फत न्यायालयादाखल झाले त्यानंतर वसंत सागर कामगार युनियन यांनी देखील 181 कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी रक्कम दिल्याशिवाय बँकेला कोणताही आदेश देऊ नये म्हणून इंटर विनर म्हणून एडवोकेट खापरे साहेब यांच्यामार्फत अर्ज दाखल केला तसेच प्रॉव्हिडंट फंड कमिशनर अकोला यांनी देखील आमचे पैसे दिल्याशिवाय बँकेला कारखाना विक्रीस परवानगी देऊ नये म्हणून अर्ज दाखल केला होता

दरम्यान वसंत कामगार युनियन व ऊसउत्पादक संघ हे वेगवेगळ्या संघटना झाल्यात

 

साखर कारखाना चालू करण्यास कर्मचारी व युनियन अडचणी आणत आहेत म्हणून त्यांच्यात तणाव निर्माण झाला अशातच उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा,माजी आमदार विजयराव खडसे, माझी चेअरमन तातूजी देशमुख यांनी ऊस उत्पादक संघ व कामगार युनियन यांच्यात समन्वय घडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी तत्कालीन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनात बैठक घेऊन वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वाने जाण्यासाठी आदेश मिळवला

परंतु कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटत नव्हता सदर प्रकरण माननीय उच्च न्यायालयात जाण्याच्या आधी संपादक विलास चव्हाण पि डी देशमुख यांनी माननीय सीनियर डिव्हिजन न्यायालय पुसद येथे एडवोकेट सुनील नरवाडे व अडवोकेट सौ नरवाडे यांच्यामार्फत50 कर्मचाऱ्यांचा अर्ज बँकेच्या विरोधात दाखल केला होता तसेच ऊस उत्पादक यांचे 70 लाख रुपये एफ आर पी रक्कम द्यावी म्हणून दोन ऊस उत्पादक यांचाही अर्ज एडवोकेट श्री व सौ नरवाडे यांच्यामार्फत दाखल केला होता त्यामुळे सदर न्यायालयात आतापर्यंत बँकेला कोणताही आदेश मिळू शकला नाही तसेच माननीय उच्च न्यायालयामध्ये देखील प्रकरण दाखल केले बालाजीराव वानखडे कोपरकर व देवानंद पाटील कूपटी यांनी ऊस उत्पादकांचे एफआरपीचे 70 लाख रुपये रक्कम दिल्याशिवाय बँकेला कोणताही आदेश देऊ नका असा अर्ज एडवोकेट खापरे साहेब यांच्यामार्फत दाखल केला त्यामुळे अनेक पेच प्रसंग निर्माण झाले म्हणून ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांत प्रचंड तणाव निर्माण झाला “कर्मचाऱ्यां च्या नेत्यांना हात दाखवू, त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ” अशा धमक्या यासाठी 181 कर्मचाऱ्यांची वेगळी बैठक घेण्यात यावी असे ठरले त्याप्रमाणे माननीय आमदार नामदेव ससाणे यांच्या घरी दिनांक 21/ 7/ 2022 रोजी आमदार नामदेव ससाणे यांच्या अध्यक्षतेत माजी आमदार विजयराव खडसे माजी चेअरमन तातू जी देशमुख अवसायक श्री गोतरकर श्री दत्त दिगंबर वानखेडे संपादक विलास चव्हाण पिके मुडे पी डी देशमुख विठ्ठल पतंगराव पिके कदम देवानंद पाटील बालाजीराव वानखेडे कोपरकर 181 ग्रॅज्युटी धारक निवृत्त कर्मचारी इत्यादीची बैठक घेण्यात आली सदर बैठकीत कामगाराचे देणे कसे द्यावे यावर एक मताने निर्णय घेण्यात आला त्याचा ठराव घेण्यात आला व अग्रीमेंट करण्यात आले त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ व प्रॉव्हिडंट फंड कमिशनरअकोला यांच्याशी माननीय नामदेवराव ससाने माननीय माजी आमदार विजयराव खडसे माननीय माजी चेअरमन तातू जी देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व कामगारांचे प्रतिनिधी यांनी चर्चा केली व मार्ग काढला

वरील निघालेल्या मार्गाप्रमाणे आज दिनांक 30 8 2022 रोजी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्यासमोर सुनावणी झाली सदर सुनावणी दरम्यान कामगार कर्मचारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रॉव्हिडंट फंड कमिशनर, अवसायक वसंत सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने आपसात झालेल्या तड जोडी बाबत न्यायालयाला सर्वांच्या वकील मंडळींनी सांगितले व प्रोसेस दाखल केला त्यावर न्यायालयाने समाधान व्यक्त करून ठरल्याप्रमाणे सर्व मुद्द्याची अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश देऊन प्रकरण निकाली काढले त्यामुळे लवकरात लवकर कारखाना टेंडर काढण्याचा मार्ग मोकळा झाला त्यामुळे कामगार कर्मचारी व ऊसउत्पादक व राजकीय नेते मंडळीत सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे

ह्या कामात आमदार नामदेवराव ससाने जिल्हा भाजपा अध्यक्ष नितीन भुतडा काँग्रेसचेमाजी आमदार विजयराव खडसे माजी चेअरमन तातूजी देशमुख,अवसायक श्री गोतरकर, जिल्हा बँकेचे अधिकारी श्री राऊत, शिवसेनेचे संतोष जाधव , भाजपचे दत्त दिगंबर वानखेडे कामगार नेते पिके मुडे, संपादक विलास चव्हाण, विठ्ठल पतंगराव, , पी डी देशमुख , देवानंद पाटील, बालाजी वानखेडे कोपरकर, जाधव सर, शिवसेनेचे बसवेश्वर शिरसागर विनोद शिंदे, अनिल गोबे भीमराव सोनुले इत्यादी शेकडो कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व सं सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वाने देण्यासाठी कोणतेही क्षणी माननीय साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालक अमरावती तथा अवसायक वसंत पोफाळी यांच्याकडून टेंडर प्रोसेस सुरू होऊ शकते! ह्या कामात अडवोकेट खापरे साहेब एडवोकेट कैलास नरवाडे साहेब एडवोकेट सुनील नरवाडे साहेब व सौ नरवाडे मॅडम यांचं मौलाचे सहकार्य लाभलं हा सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळी, कामगार, ऊस उत्पादक, यांचा विजय आहे तूर्तास एवढेच!

विलास चव्हाण- संपादक जय राज सिंहासन

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *