राजकारण

पुसद /नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार :- डॉ मोहम्मद नदीम

पुसद /नगर परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार :- डॉ मोहम्मद नदीम

 

प्रतिनिधी /एस के शब्बीर

 

 

नगरपरिषद पुसद ची निवडणूक काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रत्येक वेळी काँग्रेस नगरपालिकेची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्वतंत्रपणेच लढवत असते. त्याप्रमाणे याही वर्षी स्वतंत्रपणेच निर्धार प्रदेश काँग्रेसचे चिटणीस डॉ.नदीम यांनी जाहीर केला. ते डी.एन. काॅम्प्लेक्सच्या हिरवळीवर आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पक्षाचे पुसद न.प. निवडणुकीसाठीचे निरीक्षक द्वय माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर आणि महागांव नगरपंचायत चे माजी उपाध्यक्ष शैलेश कोपरकर हे उपस्थित होते.

या दोन्ही निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांशी येत्या नगरपरिषद निवडणुकीबाबत चर्चा विनिमय केला असून कार्यकर्त्यांच्या भावना ते श्रेष्ठींनाही कळवणार आहेत.

 

 

त्यांनी पक्षाच्या आदेशाची सविस्तर माहिती देवून पुढील निववडणुकी बाबत मार्गदर्शन केले.

सदर बैठकीला पक्ष निरिक्षक प्रकाश पाटिल देवसरकर, शैलेश कोपरकर,प्रदेश सचिव डॉ मोहम्मद नदीम,तालुका अध्यक्ष अजय पुरोहित,शहर अध्यक्ष ज़िया शेख,जिल्हा महासचिव सैय्यद इस्तियाक,अशोकबाबा ऊँटवाल, जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिंदे, गजानन देशमुख,तालुका महिला अध्यक्ष प्रा.संध्याताई कदम,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष अमजद खान,शहर अध्यक्ष नन्हे खान,विठलराव दुपारते,जब्बार लाखे,सैय्यद जानी,विधानसभा अध्यक्ष अभिलाष खैरमोड़े युवक अध्यक्ष जगदीश कदम प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सोहेल चव्हाण यांनी तर आभार मो जुनेद यांनी मानले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *