हिमायतनगर शहरात जातीय सलोखा कायम ठेवून सण-उत्सव साजरे करा.. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील
Chief editor;एस के चांद यांची बातमी
हिमायतनगर शहरात दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोळा व गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीस गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तेव्हा बोलतांना पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चना पाटील यांनी गावकऱ्यांना असे सांगितले की आपल्या शहरातील जातीय सलोखा कायम ठेवून येणाऱ्या काळातील सण व उत्सव साजरे करा व हिमायतनगर शहरातील पोलीस प्रशासनात सहकार्य करून गावची शांतता कायम ठेवा असे गावकऱ्यांना आव्हान केले व त्यानंतर स्वतः गावातील मुख्य रस्त्याने फिरून गणेश विसर्जन मार्गाची पाहणी करून कनकेश्वर तलाव येथील गणेशाचे दर्शन घेत येथील विसर्जन कुंडाची पाहणी केली आहे…