महागांव/ इजणी येथील समशान भूमीचा रस्ता हरवल्याची भूमिका
प्रतिनिधी /एस के शब्बीर महागांव
इजनी गावाशीयांना जिवंतपणी रस्त्याचा येण्या जाण्याचा त्रास आणि मेल्यानंतर स्मशानभूमीत जाण्याकरिता आज हरिभाऊ कनीराम चव्हाण यांचा अल्प आजाराने मृत्यू झाला असून शेव यात्रा नेत असताना पावसात स्मशानभूमी नसल्याने मोठ्या कठीण प्रसंगाने त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले इजनि गावकऱ्यांना हा त्रास भोगाव लागत आहे ईजनी हे गाव 5 हजार लोकसंख्येचे असून या गावांमध्ये मुळा मध्येच स्मशानभूमी नाही वारंवार निवेदनात मागणी करूनही लोकप्रतिनिधी आपल्या स्थानिक निधीमधून हीवरा ते ईजनी रस्ता व गावासाठी स्मशानभूमी देऊ शकले नाही विधानसभा व लोकसभा व जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यानंतर आपल्या क्षेत्राचे लोकप्रतिनिधी तुम्हीच. लोकप्रतिनिधी असं समजा व कामाला लागा असे सांगतात आम्ही तुमच्या इजनी गावाचा व इथला विकास आम्ही करू असेही आश्वासन देऊन सांगतात मात्र ज्यावेळेस लोकांनी त्यांना निवडून दिल त्यांनी आज पर्यंत गावाकडे चांगलीच पाठ फिरवली उजनी गावकऱ्यांना दिसून येत आहे
2019 च्या निवडणुकीनंतर कोणत्याही लोकप्रतिनिधींनी गावाकडे येऊन एकही दौरा केला नसून गावातील नागरिकांच्या कोणत्याही समस्या जाणून घेतल्या नाही आपल्या जवळच्या क्षेत्रामध्ये चांगलाच विकास करतात आवश्यक नाही तेही गोष्टी त्या ठिकाणी सुविधा करून देतात मात्र इजणी या गावला स्मशानभूमीची व इजानि हिवरा रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे तरी लोकप्रतिनिधी लक्ष एकदातरी इकडे गावाकडे वळून बघण्याची जबाबदारी घेतील का अशा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे येणाऱ्या काळामध्ये गाव आपल्याकडे वळून बघेल संपूर्ण गाव वाल्याने हे लक्ष देण्याची गरज आहे आपण फक्त ग्रामपंचायत च्या लोकप्रतिनिधी बोलत असतो मात्र ग्रामपंचायत आपापल्या स्तरावर निवेदन व ठराव देत राहत निधी मंजूर करणे हे लोकप्रतिनिधीच काम असते मात्र या बाबींना सर्वत्र जबाबदार ग्रामपंचायत नसून लोकसभा-विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती लोकप्रतिनिधी आहे कारण ग्रामपंचायत वारंवार पत्रव्यवहारातून मागनी करूनही त्यांना निधी मिळत नाही व प्रशासन हे सुद्धा याकडे लक्ष देत नाही म्हणून या गाव वाशीयांनी आंदोलन छेडणे हे महत्त्वाचा मार्गकाढला आहे