महागांव /स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त निघालेल्या रॅलीने नागरिकांचे वेधले लक्ष
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
मुलींची कन्या शाळा महागाव विद्यार्थीनींनी पोलीस कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त यावर्षी संपूर्ण भारतभर घर घर तिरंगा हा उपक्रम राबविला जात आहे तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन शालेय स्तरावर केले जात आहे याचाच एक भाग म्हणून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय महागाव च्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने महागाव शहराचे लक्ष वेधले तसेच रक्षाबंधन निमित्त पोलीस कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या.
हरघर झेंडा या उपक्रमास संदर्भात जागृती करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणातुन निघालेली भव्य विद्यार्थिनीची रॅली संपूर्ण शहरभर घोषणा देत फिरली. यावेळी नागरिकांमध्ये सुद्धा रॅली पाहून उत्साह निर्माण झाला. यावेळी तहसीलदार विश्वंभर राणे गटशिक्षणाधिकारी मारुती मडावी विस्ताराधिकारी रामकृष्ण बगाडे तसेच महागाव तहसील कर्मचारी पोलीस शिपाई प्राचार्य शीला नरवाडे व सर्व कर्मचारी तसेच कला वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग आजच्या रॅलीत उपस्थित होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी विद्यार्थिनींनी शहरातून हातात फलक घेऊन भव्य रॅली काढून पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संजय खंडारे व त्यांचे सहकारी पोलीस शिपाई यांना विद्यार्थिनीनी ओवाळणी करून राख्या बांधल्या व त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी नवभारत प्राथमिक विद्यालयचे व्यवस्थापक तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विलास नरवाडे, भगवान नरवाडे, दिगंबर गाडबैले, बाबाराव नरवाडे, देविदास गावंडे, अविनाश नरवाडे, शैलेश कोपरकर ,गजू पाटील ,निलेश नरवाडे ,संतोष नरवाडे, श्रीकांत लिगदे ,स्वप्निल नरवाडे ,अमर पाटील, महेंद्र कावळे, सुनील भरवाडे ,प्रकाश नरवाडे, पंजाब पवार ,साहेबराव सूर्यवंशी, संतोष हुंबे ,सुरेश नरवाडे, संजय भगत, एमडी सुरोशे, कुसुमवाड व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.