राजकारण

हिमायतनगर/:- क्रांती दिनाचे औचित्य साधुन शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची मानवी साखळी करून हर घर तिरंगा चा संदेश..

हिमायतनगर/:- क्रांती दिनाचे औचित्य साधुन शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची मानवी साखळी करून हर घर तिरंगा चा संदेश..

 

हिमायतनगर नांदेड;एस के चांद यांची बातमी

 

गटशिक्षण अधिकारी बालाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम..

 

हिमायतनगर शहरातील गटशिक्षणाधिकारी विभागाच्या कार्यालया कडून शहरातील सर्व शाळांना तात्काळ सूचना देऊन क्रांती दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांची शहरात भव्य मिरवणूक काढून श्री परमेश्वर मंदिर प्रांगणात मानवी साखळी करत हर घर तिरंगा या मोहिमेला व्यापक रूप देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी सर्व शाळांच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून शहरातील मुख्य रस्त्यावर एक भव्य अशी मानवी साखळी तयार करून एक वेगळा संदेश शहरातील नागरिकांना दिला..

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षा निमित्त नांदेड जिल्हा शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशाचे पालन करत हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत 9 ऑगस्ट ह्या क्रांती दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकांच्या मनात राष्ट्रभावना,प्रेम,जागृत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम गावातील प्रत्येकानी आपल्या स्वतःच्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी व आपल्या लोकांच्या मनात राष्ट्र भावना निर्माण करण्यासाठी हा उपक्रम गावातील प्रत्येक नागरिकांनी राबवावा असे आव्हान हिमायतनगर येथील गटशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे यांनी केले यावेळी शहरातील राजा भगीरथ उच्च माध्यमिक विद्यालय, हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालय ,जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा, जिल्हा परिषद शाळा नेहरूनगर, बालाजी माध्यमिक शाळा सह आदी शाळेतील 1500 च्या वर विद्यार्थी व शिक्षक ह्या मानवी साखळीमध्ये सहभागी झाले होते

 

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी अरुण पाटील, रामभाऊ सूर्यवंशी, हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचे डाके सर,राजा भगीरथ शाळेचे मुख्याध्यापक सागर सर, दिक्कतवार सर, माने सर,क्रीडा शिक्षक तिप्पनवार मॅडम,शिंदे मॅडम,कोंडामंगल सर,वानखेडे सर,कन्या शाळेचे जाधव सर,मुल्ला सर, ,गांगुलवार सर, गतपाळे सर एकलव्य स्टडी सर्कलचे संचालक एन.टी.सर,शिवाजी माने ,सह आदी शाळेचे शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *