महागांव/ येते शांतता कमेटीचे बैठक धरणे साहेब यांच्या उपस्थित पार पडली.
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
आज महागाव शहरांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक मा. डॉ. के ए धरणे साहेब यांचे महागाव तालुक्यातील सर्व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र अमृत महोत्सव आगामी पोळा गणेश उत्सव मोहरम सण या साठी चर्चेमध्ये बोलताना शांतता समितीची सभा आज दि. ८/८/२०२२ पार पडली. या सभेचे मार्गदर्शक मा. डॉ. के ए धरणे साहेब यांनी येणाऱ्या खास आगामी मोहरम पोळा गणेश उत्सव सण निमित्त बोलताना सांगितले की हिंदू धर्माचा कोणताही गैरवापर करू नये शासनाच्या आदेशानुसार व कायद्याचे पालन करून आगामी सण साजरे करावे व खास गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना बोलताना सांगितले महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार. विलास चव्हाण साहेब फुलसावंगी येथे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेश उत्सवा साठी समिती स्थापन करण्याकरिता एक दिवस नेमणार व महागाव तालुक्यातील सर्व गणेश उत्सव समिती स्थापन कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन येथे परवानगी घेणे अनिवार्य केले आहे या सभेला महागाव तालुक्यातील फुलसावंगी करंजखेड पिढी लेवा मुडाणा अंबोडा जनुना कलगांव येथून पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष व गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व कार्यकर्ते हजर होते
या शांतता समिती सभाचे मार्गदर्शक मा. डॉ. के ए धरणे साहेब. मा. श्री प्रदीप पाडवी. मा. डॉ. व्यंकट राठोड. महागावचे तहसीलदार विश्वंभर राणे. महागाव नगर सेविका करुणाताई नारायण शिरबिरे. महागाव तालुका अंतर्गत सर्व पोलीस पाटील गणेश मंडळाचे कार्यकर्ते व महागाव पत्रकार परिषद यांच्या नेतृत्वात शांतता समितीची सभा पार पडली