वरुण गॅस एजन्सी ग्राहकांची आर्थिक लुट करत असल्याचे यशवंत कावळे यांची पुरवठा अधिकारी कडे तक्रार
प्रतिनिधी /एस के शब्बीर महागांव
महागांव सामाजिक कार्यकर्ते यशवंत कावळे यांची पुरवठा अधिकारी कडे तक्रार ( परवाना रद्द करण्याची केली मागणी महागांव :- तालुक्याच्या ठिकाणी असलेली वरुण गॅस एजन्सी मागिल दहा वर्षापासून गॅस ग्राहकांना सिलिंडर चा पुरवठा करत आहे. दहा वर्षांखाली सर्व ग्राहकांना गॅस सिलेंडर भरुण हा गॅस गोडाऊनच आणावा लागत होता.
महागांव शहर सोडले असता या पाच वर्षांत वरुण गॅस एजन्सी घरपोच गॅस सिलिंडर म्हणुन फक्त गाडीने गावपोच च सिलेंडर पोहचवत आहे. गाडीवरून सिलेंडर घेताना गाडीवाला कुठल्याही प्रकारची ग्राहकांची दक्षता न घेता भरलेले सिलेंडर ग्राहकांना देत आहे. ग्राहक म्हणतो गाडीवाल्याला सिलेंडर लिकिज आहे का तपासुन दया. व.वजन करुण दया यावर गाडीवाला म्हणतो गॅस लिकिज नसते ते कंपनीकडून भरुण येते गॅस कमी व लिकिज नसते . असे उडवाउडीचे खोटे नाटे बोलून ग्राहकांना सिलेंडर देतो
गॅस सिलिंडर भरते वेळेस गॅसच्या पावतीमध्ये घरपोच सिलेंडर सर्विस चार्ज रक्कम समाविष्ट केलेली असते. तरी पण सिलेंण्डर भरते वेळेस ग्राहकांना गँसचा रक्कमेच्या अतिरिक्त पैसे मोजून व गॅस भरुण घेते ग्राहकांना अतिरिक्त रक्कम मोजावे लागत आहे. जुलै महिन्याचा गॅसची रक्कम १०९८ रुपये असुन गॅस गाडी वाले जादा पैशाची मागणी करताना दिसत आहे.
ग्राहकांनी गॅस सिलेंडर गोडाऊन वरून सिलेंडर स्वतः भरून आणले तरी गॅस वितरकांनी पावती रिबेट मध्ये न देता गॅस पावतीची पूर्ण रक्कम घेण्यात येत आहे.
महागांव तालुक्यात वरुण गॅस एजन्सी मार्फत प्रत्येक गावाच्या मुख्य ठिकाणी काँमन सर्विस सेंटर च्या नावाखाली जवळपास पन्नास ते साठ गॅस पाँईट दिलेले आहेत. याच्यांतर खेडोपाडी असलेल्या ग्राहकांवर वेगळाच कहर दिसून येत आहे गॅस दरापेक्षा पन्नास रुपयांनी गॅस महाग ग्राहकांना विकत आहेत. अनेक ग्राहक गॅस सिलिंडर संपल्यावर गॅस भरण्यासाठी गँसचा आँफीस मध्ये बुकींग करुण पावती घेण्यासाठी जातो तेव्हा गॅस एजन्सी कडुन सर्विस चार्ज काटुन पावती रिबेट मध्ये न देता गॅस आँफीस च्या काँन्टरला गॅसची पुर्ण रक्कम घेण्यात येत आहे.
रेगुलेटर लिकिज झाल्यास गॅस एजन्सी ग्राहकांना फ्री मध्ये बदलुन न देता रेगुलेटर बदलुन द्यायचे असते त्याच ग्राहकांना पाचशे रुपये अतिरिक्त द्यावे लागत आहे. आता तर या एजन्सीकडे रेगुलेटर विकत सुद्धा मिळत असल्याचे अशी ग्राहकांमध्ये चर्चा आहे.
गॅस एजन्सीमध्ये एच पी सि एल कंपनीच्या धोरणानुसार कंपनीच्या निगडीत वस्तुची विक्री करण्यात आयला हवी परंतु ईथे तर कंपनीच्या धोरणाची पाय्यमली होत असताना दिसुन येत आहे.
गॅसच्या आँफीसमधे दर्शनी दिशेला सेल्स आँफीसरचे नाव , नंबर, ईमेल आयडी असलेले फलक लावणे गरजेचे असुन फलक लावण्यात आले नाही. आज पर्यंत या वितरकाकडून ग्राहकाची लूट झाली असुन
याचा आर्थिक भुरदड सर्वसामान्य ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
वरून गॅस एजन्सी वितरक यांना दंड ठोकावून वसुल करण्यात यावा
यांची सखोल चौकशी करुण दोषी विरुद्ध कठोरात्मक कारवाई करुण वरुण गॅस एजन्सी चा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत कावळे यांनी तक्रार पुरवठा अधिकारी तहसिल कार्यालय महागांव याच्या मार्फत जिल्हाधिकारी, एच. पी. सि. एल सेल्स आँफीसर, पेट्रोलियम मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.