tv9माझा लाईव्ह न्यूज चा दणका बातमी प्रकाशित करताच बोरगडी येथे डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
नांदेड हिमायतनगर/एस के चांद यांची बातमी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी जयंती साजरी करण्यात आली असून काही कारणास्तव तेथील ग्रामसेवक हे बाहेर गेले असल्याचे दिसून आले व दुसऱ्या दिवशी टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्युज ला बातमी प्रकाशित करण्यात आली होती, हिमायतनगर तालुक्यातील तरुण तडफदार नेतृत्व लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांना माहिती मिळाली असता त्यांनी तात्काळ ग्रामसेवक यांना अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी कोणत्या कारणाने करण्यात आली नाही अशी भ्रमध्वनी द्वारे माहिती विचारली असता जयंती करतो म्हणून सांगितले व दोन तारखेला सुद्धा जयंती साजरी केली नसल्याचे माहिती मिळाली व दिनांक 04/08/2022 रोजी पंचायत समिती कार्यालय येथे मा.गटविकास अधिकारी यांना समाजसुधारक लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी न करणाऱ्या ग्रामसेवक यांच्या वर फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांनी निवेदनात म्हटले होते व निवेदन देताच दिनांक 05/08/2022 रोजी ग्रामपंचायत कार्यालय बोरगडी येथे डॉ अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे,या नंतर कुठल्याही महापुरुषांची जयंती असो किंवा पुण्यतिथी व न विसरता साजरा करण्यात येईल व या पुढे अशी चुक होणार नाही असे या वेळी बोरगडी येथील ग्रामसेवक पवन जाधव साहेब यांनी वेळी बोलताना सांगितले आहे वेळी लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष तथा पत्रकार. राजुभाऊ गायकवाड व गंगाधर गायकवाड पत्रकार व अनेक सामाजिक कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते