महागांव शहरात युवासेना आक्रमक राज्यपालांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
महागाव : वेळो वेळी वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी काल महाराष्ट्रात राहुन महाराष्ट्र राज्यच्या अपमान करणारे वक्तव्य केले. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातील जनता व मराठी माणूस संतापला आहे, त्यात शिवसेना व युवासेना देखील आक्रमक होताना आज यवतमाळ जिल्हात महागांव शहरात दिसुन आले. राज्यपाल कोषारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपाल यांना केंद्राने परत बोलुन घ्यावे व महाराष्ट्राला नवीन राज्यपाल द्यावे, यासाठी महाराष्ट्र भर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने स्वाक्षरी मोहीम आज घेण्यात आली.त्याचेच पदीसाद महागांव तालुक्यातील महागांव शहरात ही दिसुन आले युवासेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख विशाल पांडे यांच्या नेतृत्वाखाली महागांव शहरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली, यात सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला.
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे,शिवसेना तालुका संघटक रविंद्र भारती ,नगरसेवक सुजीत ठाकूर,युवासेना तालुका संघटक रुषीकेश बलखंडे, युवासेना शहर प्रमुख ओम कुसंगवार , शिवसेना शहर संघटक अनील गव्हाणे, युवासेना शहर संघटक समाधान कदम, पोटे ताई, गजानन गाडे, बंटी गीरी, आकाश बेलखेडे , शेखर बागल , रवि शिंदे, गोलू कव्हाणे, नितीन चव्हान , निलेश पानपट्टे , गोपाल दातकर , शंखर टेटर, अविनाश ठाकरे , ऋषीकेश वाघमारे, सोनू नरवाडे , किरण कस्तुरे या सोबत शिवसैनिक व युवासेना सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.