महागांव/ ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा-पेशंटचे जीव धोक्यात,
महागांव प्रतिनिधी/ एस के शब्बीर
महागांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर आपले खाजगी दवाखाने चालवीत असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात महागाव तालुका अंतर्गत येणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्या अनेक घटना घडल्याने या खाजगी दवाखाने चालविणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी महागाव प्राथमिक आरोग्य केंद्र यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुका शेवटच्या टोकावर असून आरोग्य केंद्राचे कार्यरत डॉक्टर यांची खाजगी दवाखाने चालवीत असल्याचा आक्षेप जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निवेदन द्वारे केली तक्रार
महागाव तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असुन आपत्कालीन प्रसंगी रुग्नकांना उपचार मिळत नसल्याने
या भागातील रुग्ण यवतमाळ, पुसद नांदेड रुग्णालया पर्यंत पोहचण्याच्या आगोदरच पेशंटला आपले प्राण गमावत लागतात व महागांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र चालु असून याठिकाणी रात्री बेरात्री एकही डॉक्टर हजर नसतो. त्यामुळे काही दिवसा आगोदर एका महिलेची प्रसुती रुग्णालयाच्या पायरीवर झाली होती. पुसद किंवा यवतमाळ शिवाय रुग्णांना पर्याय नसतो, तो रुग्ण तिथपर्यंत पोहचण्या आगोदरच दगावल्याच्या घटना अनेक वेळा घडल्या
आहेत. बऱ्याच मातांचे
प्रसुती पुर्वीच उपचार न मिळाल्यामुळे मृत्युचे प्रमाण देखील वाढले आहे.नुकताच बालमाता मृत्यु फुलसावंगी व काळी येथे झाला आहे. ग्रामिण रुग्णालयाची नविन इमारत ३ ते ४ वर्षापासून तयार आहे. पण सुरु का होत नाही. याचे कारण अजुनही जनतेला कळले नाही.
ग्रामीण रुग्णालये तातडीने सुरू केल्यास मध्यम वर्गासाठी व गरिबांसाठी ते जीवरक्षक ठरतील
आत्महत्याग्रस्त महागांव तालुक्यात अनेकवेळा विष प्राशन केलेले रुग्ण प्राथमिक केंद्रात डॉक्टर हजर नसल्यामुळे दगावले आहेत.
अशा रुग्णकांना पुसद, यवतमाळ शिवाय पर्याय नसतो तोपर्यंत तो रुग्ण गतप्राण होतो.त्यामुळे कायम स्वरुपी वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी. तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांचे खाजगी दवाखाने चालु आहेत.
ते बंद करण्यात यावे.
जेणे करुन रुग्णालयात आलेल्या रुग्णावर उपचार होवुन त्याला जिवदान मिळेल.
सर्व डॉक्टर व कर्मचारी हे आपल्या मुख्यालयी मुक्कामी राहतील याची खबरदारी घेवून त्यांना सुचना कराव्यात.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने खेड्यापाड्यातील रोगराई साथीचा प्रमाण रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर हजर नसल्याने ते सर्व रुग्ण खाजगी डॉक्टरकडे जात आहेत त्यामुळे ग्रामिण रुग्णालय त्वरीत सुरू करण्यात यावे अन्यथा १५ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामिण भागातील नागरिकांना सोबत घेवुन उपोषण करण्याचा ईशारा जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिलेली निवेदनाद्वारे दिला आहे.