करंजी शिवारात वीज पडून गाय दगावली.
हिमायतनगर विकास गाडेकर तालुक्यातील करंजी शिवारात बोरीच्या झाडाखाली बांधलेली एका गाय वर वीज पडून दगावल्याची घटना घडली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथे दिनांक 22 जुलै रोजी सकाळी पाच वाजता पाऊस सुरू झाला होता यात सुनंदाबाई परमेश्वर जाधव यांनी रोजच्याप्रमाणे त्याच्या शेत सर्वे नं 8 मध्ये बोरीच्या झाडाखाली एक गाय बांधली होती तिच्यावर अचानक वीज पडल्याने ती जागीच दगावली आहे. या घटनेची माहिती करंजी येथील माजी उपसरपंच नासर पठाण यांनी तलाठी यांना देताच तलाठ्यांनी सकाळी दहा वाजता घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून नुकसान भरपाई मिळवून देऊ असे त्यांनी यावेळी सांगितले आहे यावेळी सरपंच बालाजी पुट्टेवाड, माजी उपसरपंच नासर पठाण, संजय चाभरकर, गजानन जाधव, ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, साईनाथ जाधव, गजानन पुट्ठेवाड, विकास गाडेकर, उवस्थित होते.