राजकारण

आमदार ससाणे,माजी आमदार खडसे यांची वसंत साखर कारखान्यासाठी कामगारा सोबत बैठक 

आमदार ससाणे,माजी आमदार खडसे यांची वसंत साखर कारखान्यासाठी कामगारा सोबत बैठक

 

यवतमाळ प्रतिनिधी/ एस के शब्बीर

 

 

उमरखेड आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे, माजी चेअरमन तातूजी देशमुख यांच्या नेतृत्वात 181 निवृत्त कर्मचाऱ्यांचा सुटला प्रश्न!

वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी भाडेतत्त्वावर सुरू करण्यासाठी आज आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या घरी कामगारासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या मध्ये कारखान्याचे ऊस उत्पादक व कामगार यांनी मागील काही वर्षापासून सुरू केलेला संघर्ष यशस्वी झाला असून कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा मार्ग सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने मोकळा झाला होता त्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ना हरकत दिली होती परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांचा पगार त्यांना देण्यासाठी कामगार युनियन चे नेते पिके मुडे व विठ्ठल पतंगराव यांचे मार्गदर्शनात प्रकरण माननीय उच्च न्यायालय दाखल होते तसेच विलास चव्हाण. पीडी देशमुख. गजानन लोखंडे. यांचे मार्गदर्शनात दुसरे प्रकरण माननीय उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले सदर प्रकरण न्यायालयात असल्यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी टेंडर काढण्यासाठी अडचणी येत होत्या

 

त्यामुळे ऊस उत्पादक व कामगार युनियन

यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला होता

आमदार नामदेवराव ससाने ,माजी आमदार विजयराव खडसे ,माजी चेअरमन तातूजी देशमुख ,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा ,भीमराव चंद्रवंशी ,शंकरराव तालंगकर यांच्या व ऊस उत्पादन संघाच्या व कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या व अवसायक श्री गोतरकर, प्रभारी एमडी अरुण भालेकर. तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष कोंगरे व संचालकांच्या अथक प्रयत्नाने कारखाना सुरू होण्यासाठी सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले होते

भाडेतत्त्वावर कारखाना दिल्यानंतर येणारी भाड्याची जी रक्कम आहे सदर रकमेत 65 टक्के जिल्हा मध्यवर्ती बँक व 35 टक्के कामगार ना देण्याचा असा फार्मूलाही ठरला होता परंतु 181 निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेमेंट देणे बाबत हमी घेतल्याशिवाय विद्यमान न्यायालयातील प्रकरण मिटणार नाही अशी भूमिका कामगारांनी घेतल्यामुळे कारखाना भाडे तत्त्वावर सुरू होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे ऊस उत्पादक व कामगार युनियन मध्ये

आपसात भयंकर संघर्ष निर्माण झाला होता

सदर अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने नेते पिके मुडे. व्ही एम पतंगराव, संपादक विलास चव्हाण, पीडी देशमुख, पिके कदम, गजानन लोखंडे. यांनी आमदार नामदेवराव ससाने, माजी आमदार विजयराव खडसे माजी चेअरमन तातूजी देशमुख ,नितीनजी भुतडा, भीमराव चंद्रवंशी यांना निवृत्त कर्मचाऱ्यांचे पेमेंट कसे दिले जाईल याबाबत काही मुद्दे लक्षात आणून दिले व त्यांना विनंती केली की 181 कर्मचाऱ्यांची वेगळी बैठक लावा त्यांच्या संमतीने आपण हा मार्ग काढू ,आमदार श्री नामदेवराव ससाने यांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या घरी दिनांक 21 जुलै 2022 रोजी दुपारी दोन वाजता कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेतली ह्या बैठकीपूर्वी आमदार ससाने यांच्या घरी माजी आमदार विजयराव खडसे. माजी चेअरमन तातूजी देशमुख. आमदार नामदेवराव ससाने. संपादक विलास चव्हाण पिके मुडे. पिके कदम. विठ्ठल एम पतंगराव.पी डी देशमुख. गजानन लोखंडे दत्त दिगंबर वानखेडे , माजी उपाध्यक्ष अरविंद भोयर, संस्थेचे अवसायक श्री गोतरकर, प्रभारी एमडी अरुण भालेकर इत्यादी लोकांची बैठक झाली व भाजपा काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते अशा प्रकारे कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *