ताज्या घडामोडी

महागांव/ वन विभाग क्षेत्रात पिसाळलेल्या वानराला केले जेरबंद

महागांव/ वन विभाग क्षेत्रात पिसाळलेल्या वानराला केले जेरबंद

प्रतिनिधी / एस. के. शब्बीर.

महागाव शहरात हैदोस घालुन नागरिकांना त्रास देणाऱ्या वानराला महागांव वनविभागाने आज केले जेरबंद.

महागाव शहरात गेल्या अनेक दिवसांपासुन एका पिसाळलेल्या वानराने अप्रचित व चांगलाच धुमाकुळ मांडला असुन अनेक नागरिकांना चावा घेवुन जखमी केले होते त्यामुळे महागाव शहरवासीयांमध्ये पिसाळलेल्या वानराने दहशतीचे वातावरण पसरले होते वनविभागाने या वानराचा बंदोबस्त करावा अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक श्री जगदीश पाटील नरवाडे यांनी केली होती. वन विभाग क्षेत्रांनी ही बाब लक्षात घेवुन वनविभागाने वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर यांच्या नेतृत्वात ट्रॅक्युलाईज ऑपरेशन राबवुन महागाव शहरात धुमाकुळ घालणाऱ्या वानराला आज पकडले यावेळी राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये एसीएफ करे उमरखेड. डीएफओ अशोक सोंनकुसरे.यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कोल्हे,वनरक्षक गुहाडे, धुळे,आर.आर.युनिटचे प्रमुख मुकबिर वनपाल,पथकातील सर्व कर्मचारी, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित कुमार झा.यांचा समावेश होता.वानराला पकडल्यानंतर जंगलात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले व महागाव शहर च्या काही नागरिकांना

वानराने जख्मी केलेल्या लोकांना

वन विभागाकडून मोबदला देण्याची मागणी सुद्धा जगदीश भाऊ नरवाडे यांनी केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *