महागांव / जनुना करंजखेड रोड बांधकामाची कोट्यवधी रुपयांची कॉन्ट्रॅक्टदारांनी केली दिवाळी
तालुका प्रतिनिधी/ एस के शब्बीर
महागाव तालुक्यातील जनुना करंजखेड कासारबेहळ जाणारा मार्ग नुकताच डांबरीकरण झालेला रस्ता दोन महिन्यातच उखळला शासनाच्या एक कोटी रुपयाची रोड कॉन्टॅक्ट दरांनी केली दिवाळी जिल्हा परिषद बांधकाम रोड निधी करिता एक कोटी रुपये पहिल्याच पावसात गेले वाहून की काय अशी परिस्तिथी या ठिकाणी झाली आहे…सदर रस्ता पुन्हा डांबरीकरण करून संबंधित कंत्राट दारावर व अधिकारी यांच्यावर कारवाई करणे बाबत. महागाव तालुक्यातील नागरिकांनी गाठली पंचायत समिती… सदरचा रस्ता त्वरित दुरुस्त न केल्यास तहसील कार्यालय महागाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला.नुकताच डांबरीकरण झालेला नवीन रस्ता हा बऱ्याच ठिकाणी खरडून गेला असून काही ठिकाणी खड्डे पडले आहे त्यामुळे असे निदर्शनास येते की सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर रस्त्या करिता वापरण्यात आलेल्या मटेरियलची गुणवत्ता तपासण्यात आली नसल्यामुळे सदर रस्ता हा उकडून जात आहे तरी सदर रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त जमिनी या रस्त्याला लागून असल्यामुळे त्यांना या पावसामुळे दिवसांमध्ये रस्ता अभावी शेतजमीन ओलीत करणे पडले कठीण महागाव पंचायत समितीच्या माननीय गटविकास अधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना गोर बाळू भाऊ राठोड यांनी आपल्या निवेदनातून सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करावी व संबंधित दोषीविरुद्ध कारवाई करण्यात यावी व सदर रस्ता पुन्हा डांबरीकरण करून दुरुस्त देण्यात यावा असे न झाल्यास नाईलाजाने आम्हाला तहसील कार्यालय महागाव समोर रास्ता रोको आंदोलन करावे लागेल असे देखील गोर बाळूभाऊ राठोड जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद यवतमाळ यांनी आपल्या निवेदनातून सांगितले