करंजी ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी.
हिमायतनगर प्रतिनिधी;
हिमायतनगर तालुक्यातील मौ.करंजी ग्रामपंचायत कार्यालयात आज दि 18जुलै रोजी सोमवारी प्रभावी लेखणीतून व अनमोल वाणीतुन वंचिताच्या व्यथा मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच बालाजी पुट्ठेवाड,उपसरपंच पांडुरंग सूर्यवंशी, संचालक नासर पठाण,माजी उपसरपंच दत्तराव सूर्यवंशी, लहुजी शक्ती सेना युवक तालुकाध्यक्ष विकास गाडेकर,ग्रामसेवक ए.पी. सावंत, ग्रामपंचायत सदस्य अरुण गाडेकर, निरंजन जाधव, रामकिसन सुनकरवार, शबीर पठाण, केशव पाटील सोळंके, मारोती गाडेकर, गजानन जाधव, पत्रकार परमेश्वर सूर्यवंशी, कृष्णा माने, देवराव परभणकर, रसूल शेख, लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तानाजीभाऊ गाडेकर, श्रीराम गायकवाड, नदकुमार मिराशे, संतोष गाडेकर, दिलीप गाडगेराव, भागोराव मिराशे प्रसाद गाडेकर, साहेबराव सूर्यवंशी,सेवक खंडू कदम, वसंता गाडेकर आदी जन उपस्थित राहून अभिवादन केले.