ताज्या घडामोडी

शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या सोसायटी संचालक संतोष आंबेकर यांची मागणी 

शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या सोसायटी संचालक संतोष आंबेकर यांची मागणी

हिमायतनगर प्रतिनिधी

हिमायतनगर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी सोसायटी संचालक संतोष अंबेकर यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

 

हिमायतनगर तालुक्यात मागील आठ दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झाले आहे काही घराची पडझड काही जनावरे वाहून गेली तर काही उपासमारीने मरण पावली आहेत शेतात पाणी साचल्याने शेताचे शेत तळे झाले आहेत त्यामुळे पीक पूर्णपणे वाहून गेली आहे तसेच त्यासोबत मातीही वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे तर शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे तरीही प्रशासनाने शेतीची व पडझड झालेल्या घराची त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत करावी व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करावे तसेच रमाई आवास योजनेत या कुटुंबांना प्राधान्य देऊन त्यांना पक्की घरे देण्यात यावी व प्रशासनाने शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सोसायटी संचालक संतोष अबेकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी अभिलाष जयस्वाल, साहेबराव बोलपेलवाड, केरबाजी सिद्धेवाड, दिनेश राठोड, सिद्धार्थ हनवते भारत पाईकराव अदी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *