एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार;हदगाव-बरडशेवाळा जवळ घडली घटना
हदगांव/इसबके शब्बीर यांची बातमी
हदगाव तालुक्यातील नांदेड नागपूर रोडवरील बरड शेवाळा येथे झालेल्या अपघातामध्ये बामणी फाटा येथील संतोष कोंडबा टोपलेवार (वय २९ वर्ष) सुरेखा संतोष टोपलेवार (वय २५) सतीश मसाजी टोपलेवार (वय २५ वर्ष) सर्व राहणार बामणी आबादी येथील असून हे कुटुंब मोलमजुरी करून उपजीविका भागवणारे होते आषाढी एकादशी निमित्त वडील हे कोंडबा टोपलेवार हे पंढरपूर येथे जाऊन दर्शन घेऊन आले आणि आणलेला प्रसाद हा हदगाव मुक्कामी असलेले टोपलवार कुटुंबातील नातेवाईकांना नेऊन देण्यासाठी मुक्कामी येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत हे तीन व्यक्ती जागीच मृत्यू झाल्या , ही माहिती मनाठा पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना भ्रमणध्वनीवरून समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्या मृत व्यक्तींना हदगाव उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे उत्तरे तपासणीसाठी आणण्यात आले . टोपलेवार कुटुंबावर काळाने घातलेल्या घाल्याने कुटुंबातील तीन व्यक्ती एकाच वेळी अपघातात मृत्युमुखी पडल्यामुळे हदगाव तालुक्यासह शहरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे