हिमायतनगर तालुका अध्यक्ष यांच्या पुढाकाराने वन्य प्राण्यांचे जीव वाचले
हिमायतनगर : एस के चांद यांची बातमी
हिमायतनगर विदर्भ बाॅडर असलेल्या सिरपल्ली गावांचा अतिवृष्टीमुळे जन संपर्क तुटल्याने काही वन्य प्राणी आपला असरा घेऊन दोन दिवसांपासून झाडवरती होते तेव्हा गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील शिरपल्लीकर यांनी भाजपा तालुकाध्यक्ष आशिष भाऊ सकवान यांना फोन केला आणि या प्रसगाची माहिती रात्री 9 वाजता दिली तेव्हा तालुका अध्यक्ष यांनी वनविभाग अधिकारी चव्हाण यांना तातडीने फोन करून तेथील व्यवस्था तात्काळ करण्यात यावी असे सांगितले तेव्हा अधिकारी यांनी या घटनेची चौकशी येथिल वन्य प्राण्याला कसा पध्दतीने वाचवता येईल या बद्दल माहिती घेवून सकाळी ठिक सहा वाजता फारेस्ट अधिकारी व वनविभाग अधिकारी त्या घटनेच्या स्थळी पोहोचलं व तेथील वन्य प्राण्यांला हलविण्यात आले त्यामुळे आता वन्य सुखरुप बाहेर खेळु लागले असे तेथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील यांनी पत्रकारांशी सांगितले आहे