अर्धापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या अर्धापुर एम आय एमच्या वतीने मागणी
अर्धापूर प्रतिनिधी = तालुक्यात मागील दोन दिवस झालेल्या प्रचंड अतिवृष्टीने तालुक्यातील यांच्यावतीने मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली. तर नदीला आलेल्या पुरामुळे पिकासह शेतजमीन खरडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ए आय एम आय एम नगरसेवक शाहबाझ बैग, रहमान , शेख शफीक बासित खतीब अर्धापुर तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.गेली दोन वर्षांपासून विविध अडचणींचा करित आसमानी आणि सुलतानी संकटाला तोंड देत आर्थिक तोट्यात आपला शेती व्यवसाय करीत आहेत. यंदा सुरूवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी आदी पिके बहरून आली. त्यामुळे भविष्यात चांगले उत्पादन मिळेल, या आशेने शेतकरी वर्गातून समाधान दिसून आले. मात्र मागील दोन दिवस सर्वत्र प्रचंड अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने शेतातील डोलत असलेली खरिपाची पिके अती पावसामुळे उध्दवस्त झाली. तर नदीच्या पुरात शेतकरी व शेतकऱ्यांचे पशुधन वाहून गेले. तसेच नदीकाठच्या शेत जमीनी खरडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या संपूर्ण नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाकडे पाठवावेत. तसेच राज्य शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन अर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ए आय एम आय एम नगरसेवक
शाहबाझ बैग, रहमान , शेख शफीक बासित खतीब ,व आदी नागरिकांनी अर्धापुर तहसीलदार यांना देण्यात आली आहे.