वाघी येथे कॅनाल फुटुन शेतात पाणी शिरल्याने शेताला तळ्याचे स्वरुप पिके पाण्याखाली..
हिमायतनगर प्रतिनिधी (विकास गाडेकर करंजी) तालुक्यातील वाघी येथे अतिवृष्टीमुळे कॅनाल भरून वाहत असुन सदरील कॅनाल फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले असुन संपुर्ण पीके पाण्याखाली गेली असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील आठ दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे दुहेरी अतिवृष्टी झाली असुन या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
पेरण्या केल्यानंतर पिकांची वाढ होत असतांनाच पावसाने हजेरी लावल्याने पिके उभे राहण्या अगोदरच अतिवृष्टीमुळे खचून गेली आहेत.तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत असुन जमीन पाण्याखाली गेल्या असल्याने पिक दिसेनासे झाली आहेत. वाघी येथिल शेतकरी शिवाजी दत्तराव देवसरकर या शेतकऱ्यांच्या शिवारातुन वाहणारे कॅनाल मुसळधार पाण्याच्या वेगाने फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरुन तळ्याचे स्वरुप आले आहे. कॅनल फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करुन मदत देण्याची मागणी अमोल शिवाजीराव देवसरकर यांनी केली आहे.