मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील शेतकऱ्याची विहीर कोसळली.
हिमायतनगर विकास गाडेकर
तालुक्यातील करंजी,सोनारी,सरसम परिसरात मागील आठ दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे करंजी येथील शेतकरी शेख फकीरसाब शेख ताजोदीन शेत शिवार सरसम गट क्रमांक 147/3 यांच्या शेतात बांधलेले विहीर अती पावसामुळे कोसळली असून विहिरी मध्ये असलेली मोटार,पाईप, केबल आत मध्ये अडकून पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
हिमायतनगर तालुक्यात मागील आठ दिवसापासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील करंजी,सोनारी, सरसम,परिसरातील जवळपास सर्वचशेतकऱ्याचे जमिनी पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्या तर काही शेतकरी्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे काही शेतकऱ्याचे पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली आहे.त्यातच हिमायतनगर तालुक्यातील करंजी येथील शेतकरी शेख फकीरसाब शेख ताजोदीन शेत शिवार सरसम गट क्रमांक 147/3 असुन मागील आठ दिवसाच्या मुसळधार पावसामुळे विहीर कोसळली असून विहिरी मध्ये असलेली मोटर पाईप केबल आतमध्ये अडकून पडल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे.
तरी शासनाने सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जातं आहे.