हिमायतनगर : पतीला शाॅक लागल्याने पत्नीने महावितरण ठेकेदार विरोधात पोलिसात दिली तक्रार
हिमायतनगर/ प्रतिनिधी :
हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर येथिल शेतकरी श्रीरंग शिंदे सर्वे नंबर ८३ असुन यांचा शेतीतुन विद्युत् प्रवाह झालेला आहे पण मध्यरात्री पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे येथिल विद्युत प्रवाह होणारा पोल रात्रीला पडलेला पाहून यांनी त्यांच्या भागातल्या लाईन मेनला फोन केला या घटनेची माहिती देण्यासाठी वारंवार फोन करीत राहिले तरी देखील फोन उचलला गेला नाही काही वेळ म्हणजे दोन तीन तासांनी जनावरांची व्यवस्था करण्यासाठी तो काही अंतरावरुन जात असताना त्यांच्यावर विद्युत प्रवाह पसरला आणि ते जमीनीवर कोसळले ही घटना घडताच गावातील नागरिक धावले आणि त्यांना तातडीने हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर यासाठी त्याच्या पत्नीने महावितरण कंपनीच्या व ठेकेदार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व जमनीवर पडलेल्या पोलाची नुकसान भरपाई त्यांच्याकडुन घेण्यात आली पाहिजे आशी तक्रार महिलांनी दिली आहेच
बोगस ठेकेदार यांच्यावर कारवाई होणार का?
महावितरण कर्मचारयाचा हलगर्जिपणा थांबणार का?