उमरखेड/बिटारगाव येथे शेतकऱ्यांच्या १२० जनावरांचे लसीकरण करण्यात आले
जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर
उमरखेड : ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव या कार्याक्रमातंर्गत कृषी महाविद्यालय उमरखेड येथिल कृषीदुत्तानी उमरखेड तालुक्यातील बिट्टारगाव येथे पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंभार बी. एन यांच्या मर्गदर्शना खाली गुरुवारी २३/०६/२०२२ रोजी लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आले होते शेतकऱ्यांच्या जनावरासाठी शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यात आले. या मान्सूनपूर्व जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी १२० जनावरांचे लसीकरण झाले.सदर उपक्रम कृषी महाविद्याया चे प्राचार्य श्री. सचिन चींतले सर,RAWE ग्रामीण कृषी जागरुकता. अधिकारी श्री. ए. बी. तामसेकर सर.व कृषी विद्यार्थ्यांच्या नियोजनात लसीकरण जनावराचे पार पडले . यात ६ गुरांचे खच्चीकरण, ३० शेळी व मोठे जनावरांचे उपचार, ४०शेळी व मोठ्या जनावरांचे जंत निर्मूलन, २९ म्हशीना सुद्धा लसीकरण करण्यात आले तसेच १५ जनावरांचे गाभण तपासणी करण्यात आली. यावेळी उमरखेडचे पशुधन विकास अधिकारी डॉ. कुंभार बी. एन. पशुधन पर्यवेक्षक डॉ. अदिनाथ लाठे, कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन विभगचे श्री. सचिन देशमुख सर. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित कृषी विद्यार्थी करोती रामटेके, मिथिल रामटेके, जय जोग, अभिषेक घोडम, स्वप्निल निकोडे, सोमेश बोबडे, प्रजल दवंडे, ईश्वर केने, शिवम राऊत, कुणाल भोसे आदींसह गावकरी हजर होते.