दुधड येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक जिल्ह्यावरून करतात अप-डाऊन….
विद्यार्थ्यांची गुणवत्ता.आणि सुरक्षा वाऱ्यावर..
हिमायतनगर प्रतिनिधी विकास गाडेकर
तालुक्यातील दूधड /वाळकेवाडी आदिवासी बहुल भागअसल्यामुळे येथे शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची स्थापन करण्यात आली,कारण दुर्गम भागातील आदिवासी मुलांना शिक्षणच्या प्रवाहात आणावं या हेतूने शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून शाळेची उभारणी केली पण येथील मुख्याध्यापक व शिक्षकांचे उपडाऊन थांबायच नाव नाही…
आदिवासी भागात शिक्षणाची सोय व्हावी आणि त्यांना समाजप्रवाहात आणावे, म्हणून शासनाने राज्यात आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध प्रकल्पांची निर्मिती केली त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प कीनवट कार्यालयांतर्गत
१९७२ पासून ठिकठिकाणी शासकीय आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या.
क्षेत्र विकास दृष्टिकोन समोर ठेऊन सुधारित आश्रमशाळा संहितेनुसार आदिवासी संकुल तथा गाव विकासासाठी आदिवासी विद्यार्थी निवास, भोजन, शिक्षणांची सुविधा शासनाकडून पुरविण्यात येते . त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने आश्रमशाळेत तथा मुख्यालयाच्या ठिकाणी वास्तव्यास असणे बंधनकारक करण्यात आले.
परंतु आज शाळेची दयनीय अवस्था आहे .
इयत्ता 1 ली ते 12 पर्यंत विद्यार्थी व विद्यार्थिनी या ठिकाणी निवासी राहतात तरी पण,
मुख्याध्यापक्कासह शिक्षक 75 कि मी अंतरावर असलेल्या नांदेड या ठिकाणावून करतात ये-जा (अपडाऊन) करतात
त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर व शिक्षण गुणवंत्तेवर नक्कीच परिणाम पडल्याशिवाय राहणार नाही..
जवळपास 500 मुलं व मुली वस्तीग्रहात निवासी राहतात त्यांची शैक्षणिक गुणवंत्ता वाढविण्यासाठी संध्याकाळच्या वेळेस अभ्यास करून घेण्याची जीमेदारी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडे असते पण स्वतः शाळेचा मुख्याध्यापक जिल्ह्यावरून ये-जा करत आहे
त्यामुळे जे विद्यार्थी निवासी राहतात त्यांचे भवितव्य मात्र अंधारात दिसत आहे…
यवढेच नव्हे तर शाळेच्या वेळेवर हजर राहण्यास शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सुद्धा हलगराचीपणना पाहायला मिळते …
या सर्व गोष्टीची एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट येथील मा. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने दख्खल घेऊन होणारे अपडाऊन तात्काळ थांबवावे…