राजकारण

लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष पदी प्रसादभाऊ गाडेकर तर सुशांत तपासकर तालुका सचिव पदी निवड.

लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष पदी प्रसादभाऊ गाडेकर तर सुशांत तपासकर तालुका सचिव पदी निवड.

 

नांदेड : एस के चांद यांची रिपोट

 

हिमायतनगर तालुक्यात अग्रेसर असलेल्या लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे कार्य अतिशय जोमाने असते कुठल्याही परिस्थितीत संघटनेचे कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द मनात धरून काम केले जाते,अशातच तालुक्यातील मौजे करंजी येथील माननीय प्रसादभाऊ गाडेकर यांचे कार्य समाजात व संघटने बदल जोमात असतांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन लहुजी शक्ती सेनेच खंबीर नेतृत्व लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड व लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष तानाजी गाडेकर, यांनी प्रसाद गाडेकर यांची सोशल मीडिया तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे तसेच सिरपल्ली येथील तरुण तडफदार नेतृत्व सुशांत तपासकर यांची सोशल मीडिया तालुका सचिव पदी निवड करण्यात आली आहे. हिमायतनगर तालुक्यात लहुजी शक्ती सेना गावा गावात व घरा घरात लहुजी शक्ती सेना दिसेल सोमनाथ भाऊ कांबळे

मणल्या प्रमाणे आपल्या हिमायतनगर मध्ये लहुजी शक्ती सेना मोडु देणार नाही कसल्याही प्रकारची गालबोट लागणार नाही, माझे जे काही आरोग्य मध्ये सहा सात महिने गेले आहेत त्यामध्ये चळवळ थांबली होती पण आता तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद मुळे मी पुर्ण पणे बरा झालो आहे आज पर्यंत हिमायतनगर तालुक्यातील जे काही मातंग समाजाच्या मागण्या अपुर्ण राहिल्या आहेत ते नक्कीच पुर्ण करण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरुन न्याय मागितल्या शिवाय आता गप्प बसणार नाही असे राजुभाऊ गायकवाड यांनी बोलताना सांगितले आहे,वेळी लहुजी शक्ती सेना सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष तानाजी गाडेकर, लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते माननीय अरुणभाऊ गाडेकर,सिरपल्ली येथील लहुजी शक्ती सेना माजी तालुका उपाध्यक्ष प्रशांत तपासकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल गाडेकर,गणपत तपासकर, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *