ताज्या घडामोडी

रुद्राणीच्या ठेकेदाराकडून राष्ट्रीय मार्गावरील पुलं अर्धवट- पहिल्याच पावसात हदगाव- हिमायतनगर मार्ग बंद


रुद्राणीच्या ठेकेदाराकडून राष्ट्रीय मार्गावरील पुलं अर्धवट-

पहिल्याच पावसात हदगाव- हिमायतनगर मार्ग बंद

 

प्रतिनिधी / विकास गाडेकर यांची बातमी

 

हिमायतनगर गेल्या ३ वर्षांपासून सुरु असलेल्या अर्धापूर – फुलसांगवी रस्त्याच्या अर्धवट कामामुळे भर पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना देखील ठेकेदारकडून अर्धवट पुलाचे कामे करण्यास दिरंगाई चालविली जात आहे . याचा फटका काल दि . २१ च्या रात्रीला झालेली दमदार पावसामुळे वाहनधारकांना बसला आहे . रात्री झालेल्या पावसामुळे हदगाव – हिमायतनगर रस्त्यावर सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग आज सकाळपासून बंद झाला आहे . त्यामुळे दळणवळणाला अडथळा निर्माण झाला असून , हदगाव हिमायतनगर गाठण्याशी नागरिकांना लांब पाल्याच्या रस्त्याचा वापर करावा लागतो आहे.मंगळवारी रात्रीला झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धापूर – फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरील आष्टी नजीकचा अर्धवट पुलाजवळील वळण रस्ता वाहून गेल्यामुळे हदगाव हिमायतनगर मार्ग बुधवारी सकाळपासून बंद झाला आहे . येथील पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासन सुरु असताना ठेकेदाराने काम पूर्ण करण्यात दिरंगाई चालविल्यामुळे येथे बनविण्यात आलेला पर्यायी पुलं वाहून गेला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *