हिमायतनगर तालुक्यातील शासकीय अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणावरून करतात अपडाऊन.
हिमायतनगर / विकास गाडेकर
अपडावून थांबवा तालुक्यातील सामान्य जातेची मागणी
हिमायतनगर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी हे चक्क जिल्ह्याच्या ठिकाणी राहून सोनारी, करंजी,जवळगांव सरसम,कामारी,दूधड, वाळकेवाडी, खडकी, पोटा, कारला,पिचोडी,वारंगटाकळी, आदेगाव,टेभी,पवना,सह अनेक खेडेपाड्यातील व सर्व गावातील अधिकारी कारभार जिल्ह्याच्या ठिकाणी पहात असून परिणामी नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शासन नियमानुसार शासकीय अधिकारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना मुख्यालय तर सोडाच तालुके ठिकाणीसुद्धा आता चक्क शंभर किलोमीटर अंतरावरील जिल्ह्याच्या ठिकाणावर राहुल ग्रामीण भागातील कारभार पाहणारे अनेक अधिकारी-कर्मचारी आहेत त्याचाच भाग म्हणून हम भी कुछ कम नही असे म्हणत सोनारी जवळगांव कामारी पोटा पारवा दूधड वाळकेवाडी सरसम कारला चिचोंडी याच बरोबर वारंग टाकळी येथील ग्रामसेवक तलाठी मंडळ अधीकारी तसेच आरोग्य अधिकारी कर्मचारी कृषी अधीकारी कर्मचारी सामाजिक वनिकरण अधिकारी कर्मचारी वन बिभाग अधिकारी कर्मचारी या सोबत जिल्हा परिषद शाळे चे शिक्षक असे अनेक हिमायतनगर तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी राहून कारभार पाहत असल्याने गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तहसील, पंचायत समिती,कर्मचारी हे रेल्वे वेळा पञकानुसार कार्यालयात येत असून आणि तिन वाजेच्या दरम्यान नांदेड प्रयाण होत असल्याने सर्व सामान्यांच्या कामाचा खोळंबा होत असुन याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी समोर येत आहे . त्याचबरोबर पंचायत समितीचे अभियंता याच्यासह तहसील चे कर्मचारी हे सकाळी पॅसेंजर ने आकरा वाजता आफीसला येवून कधी तिन किंवा पाच वाजेच्या रेल्वे ने नांदेड प्रयाण होत आहेत.
या प्रकरणात तक्रारी अनेक वेळा करून सुध्दा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदरील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याचे दाखवून राहत शासनाचे हजारो रूपयांचे भाडे कागदोपत्रीच दाखवत भाडे उचलून अपडावून करीत आहेत.त्यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांची कामे वेळेत होत नसुन तिन वाजेच्या नंतर तहसील, पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट दिसत आहे. या गंभीर बाबीकडे तहसीलदार महोदय .व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी. यांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी .व अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहण्याची सक्ती करावी अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून करण्यात येत आहे.