नांदेड प्रतिनिधी /
सन २०१७ मध्ये तालुक्यातील चिखली वनक्षेत्रात वनरक्षकांना जबर मारहाण करून सागवान लाकुड चोरणाऱ्या पाच जणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी ५ वर्ष सक्तमजुरी आणि प्रत्येकास ५ हजार ७५० रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे, अशी माहीती किनवटचे वनक्षेत्रपाल प्रमोद राठोड यांनी दिली.
या खटल्याची सुनावणी नांदेड
न्यायालयात न्यायालयाच्या प्रक्रियेत उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार न्यायाधीश एस. ई. जगताप यांनी पाच आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३९५ नुसार पाच वर्ष सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंड तसेच भारतीय दंड संहितेच्या ३५३ नुसार पाच वर्ष सक्तमजुरी आणि २ हजार दंड तसेच कलम ३३६ नुसार तीन महिने सक्त मजुरी आणि इतर कलमांसाठी शिक्षा आणि १ हजार ७५० रुपये दंड असा एकूण ५ हजार ७५० रुपये दंड
झाली. ठोठावण्यात आला आहे.
सर्व शिक्षा आरोपींना सोबत भोगायच्या आहेत. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता बी. एम. हाके यांनी सरकार पक्षाच्या वतीने सादरीकरण केले. आरोपीच्या वतीने अॅड. गणेश जामकर यांनी काम पाहिले. या खटल्यात पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार भगवान महाजन आणि एस.एस. ढेंबरे यांनी पैरवी अधिकाऱ्यांच्या भुमिकेत आपली जबाबदारी पार पाडली.