हिमायतनगर येथील शासकीय जिल्हा परिषद् उर्दू व् मराठी शाळाकड़े आमदार माधवराव पाटीलांनी लक्ष देण्याची गरज,
हिमायतनगर / एस के चांद यांची रिपोट
शहरातील सर्वात जुनी जिल्हा परिषद् उर्दू मराठी मेडियम शाळेची देख भाल नसल्याने येथील शाळा डाक डूगीच्या अवस्थेत आहेत त्यामुळे येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत नाहीत कालांतराने ही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शहरातील शासकीय जिल्हा परिषद् शाळा वाचविन्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष देण्याची अत्यंत गरज असल्याचे पालक वर्गातून बोलल्या जात आहे
इ. सन 1994 मध्ये हिमायतनगर शहरात जिल्हा परिषद् हायस्कूल बंद होण्याच्या मार्गावर होते त्यावेळेस हिमायतनगर येथील उर्दू चे प्रसिद्ध पत्रकार असद मौलाना यांनी पाच दिवसाचे आमरण उपोषण कडून येथील शाळा पुन्हा चालू केल्या व येथील शाळेत शिक्षण व्यवस्था वाढवा व् शिक्षकांची भर्ती करा ह्या मागणी साठी त्यांच्या सह आदी जणांनी संघर्ष केल्यामुळे हिमायतनगर जिल्हा परिषद् शाळा आजपर्यन्त जीवंत होती पण शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे व गावातील राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आज शहरातील सर्वात जुनी जिल्हा परिषद् शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे ह्याचा फटका येथील गोर गरीबांच्या लेकरांना बसणार आहे त्यांना विना मूल्य निशुल्क शिक्षणापासून वंचित ठेवन्याचे काम येथील राजकीय मंडळी सह खाजगी संस्था चालकांकडून होत आहे
असाच काहीसा प्रकार नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील जिल्हा परिषद् शाळा नांदेड येथील मल्टीपर्पस हायस्कूल, किनवट येथील जिल्हा परिषद् शाळा बंद झाल्याने खाजगी शाळांनी येथे आपला मनमानी करून शाळेच्या फि च्या नावावर हजारों लाखोंची लूट करण्याच्या गोरख धंदा सुरु केला आहे त्यामुळे गोर गरीबांची लेकरे शिकावी तर कुठे शिकावी ? हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शहरातील जिल्हा परिषद शाळा हे गरीबांच्या लेकरांसाठी आज पर्यंत वर्दान ठरत आली आहे त्यामुळे ती जिल्हा परिषद् उर्दू मराठी शाळा वाचविन्याची आजच्या काळाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे त्यामुळे येथील मुलांच्या उज्वल भविष्यसाठी व् शिक्षणाला उच्च स्तरावर नेण्यासाठी जिल्हा परिषद शाळाकड़े विद्यमान आमदार माधवराव पाटिल यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी हिमायतनगर शहरातील पालकांनी केली आहे
चैकट
( जिल्हा परिषद् शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आज जिल्हा परिषद् शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे,
आमच्या मुलांच्या उज्वल भविष्यसाठी व् शिक्षणाला उच्च स्तरावर आणण्यासाठी जिल्हा परिषद् शाळाकड़े आमदार माधवराव पाटिल यांनी त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी हिमायतनगर शहरातील सामाजिक कार्यकर्ते एस.डी.अमेर यांनी केली आहे,)