महागाव/१६ कोटी रु.कान्हा फाटा ते खडका रोडचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने मा. स.गजानन कांबळे यांनी अभियंता ना केली चौकशी ची मागणी
एस के शब्बीर यांची बातमी
महागाव तालुक्यात ईगल कंट्रक्शन कंपनी च्या विरोधात मा सभापती गजानन कांबळे यांनी होणारे रोड बांधकाम निकृष्ट होत असल्याने कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी व उप अभियंता प्रकाश झळके यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची केली मागणी कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी व उपअभियंता प्रकाश झळके हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणून बुजून या भ्रष्ट कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप मा सभापती गजानन कांबळे यांनी केला आहे कान्हा फाटा ते खडका रस्ताच्या कामात अनियमितता चौकशी करण्याची मागणी या रोड करीता यवतमाळ जिल्हा म्हणून सोळा कोटी रुपये येवढे मंजूर आहेत महागांव :- तालुक्यातील गुंज ते खडका रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामावर लाखो रुपये खर्च केले जात असुनही रस्ताच्या कामात प्रंचड घोळ दिसुन येत आहे. या रस्ताच्या कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्यामुळे हा रस्ता लवकरच खराब होण्याची शक्यता नागरिकांकडून व माजी सभापती गजानन कांबळे यांचे कडून वर्तवली जात आहे.
या रस्ता कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी होत आहे. गुंज ते खडका रस्ताची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे त्याची मजबूती व खडीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र या कामात प्रंचड अनियमितता दिसुन येत आहे.
खडीकरण करण्यासाठी वापरण्यात येत असलेली खडी ही माती मिश्रित असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर, रस्त्यासाठी टाकण्यात येत असलेल्या खडीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक मातीचे प्रमाण दिसून आले. असे असतानाच रस्त्याच्या बाजूलाच चारी करून त्यातून काढण्यात आलेला मातीवजा मुरूम या ठिकाणी रस्ता कामात वापरण्यात येत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे हे काम सुरू असताना स्थानिक प्रशासन मात्र कोणत्या दबावाखाली या कामाकडे दुर्लक्ष करत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
या रस्त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे नमुने घेऊन तपासण्याची गरज आहे. मात्र, स्थानिक प्रशासकीय अधिकारी याकडे कानडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.कामाची विचारपुस केली असता माझ्या अंगावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न व माझा जिवास धोका निर्माण झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील….
गजानन कांबळे माजी सभापती पं.स