क्राईम डायरी

यवतमाळ/ पुसद 7 मे रोजीच्या सकाळी 6 वाजता कोपरा फाट्याजवळ नाल्यामध्ये युवकाचा पाण्यात तरंगताना मृत्यू देह आढळला

यवतमाळ/ पुसद 7 मे रोजीच्या सकाळी 6 वाजता कोपरा फाट्याजवळ नाल्यामध्ये युवकाचा पाण्यात तरंगताना मृत्यू देह आढळला

 

जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर

 

पुसद शहरापासून कोपरा फाट्याजवळील नाल्यामध्ये मृतदेह आढळल्याने या- जा नागरिकांनी ही माहिती पोलीस पाटील यांना दिली पोलीस पाटील घटनास्थळ घाटून शहर पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली त्यानंतर शहर पोलीस स्टेशन चा फौजफाटा घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करताना युवकाच्या खिशात बिल व काही कागदपत्रे आढळून आल्याने युवकाची शहानिशा उघडकीस आली मृतदेह आढळून आलेल्या युवक महागाव तालुक्यातील सवना येथे रहिवासी असून युवक अंकुश असल्याचे निष्पन्न झाले संजय नारायण हनवते यांच्या नावाने असलेले लाईट बिल सापडले . शहर पोलीसांनी ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना संपर्क साधून मृतदेह आढळल्याची माहिती दिली . घटनास्थळी अंकुशचे वडील हजर झाले असता एकच टाहो फोडला होता . अंकुश ला आई – वडील व एक लहान मुलगा असल्याची माहिती समोर उघडकीस आली आहे . शहर पोलीस स्टेशनमध्ये तुर्तास मर्ग दाखल केला आहे . प्रकरणाचा अधिक पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *