औरंगाबाद येथील मनोज अव्हाड या मातंग युवकाचा निर्घुण खून करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
हिमायतनगर येथे लहुजी शक्ती सेनेची मागणी
शेख चांद यांची बातमी
औरंगाबादमध्ये मनोज अव्हाड यांना चोरीच्या संसय मनात धरुन खुन करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी म्हणून हिमायतनगर तालुक्यात लहुजी शक्ती सेनेचे वतीने पदाधिकारी यांनी निषेध नोंदवून प्रशासनाला निवेदन देण्यात आले दिनांक.20/04/2022 रोजी औरंगाबाद येथे आठ जणांनी मनोज अव्हाड यांनी चोरी केली आहे अशा संशय मनात धरुन मनोज अव्हाड यांना त्यांच्या घरी जाऊन कामावर जायचे आहे सांगुन बोलवुन नेले व त्या ठिकाणी मनोज अव्हाड यांना आठ जणांनी मनोज अव्हाड यांचे हात पाय बांधून त्याला लोखंडी रॉड व लाकडी बांबु ने बेदम मारहाण करण्यात आली होती मारहाणीत मनोज अव्हाड चा मृत्यू झाला होता त्यामुळे गुंडांनी मनोज अव्हाड यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते त्यावेळी डॉक्टरनी मृत्यू घोषित करण्यात आले होते सदरील प्रकरणातील सर्व आरोपींचा न्यायालयात खटला जलदगती चालऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या वतीने हिमायतनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आंदोलनात नुकसान भरपाईची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहिलं असे निवेदन लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे जिल्हा युवक उपाध्यक्ष संतोष हातवेगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 27/04/2022 रोजी तहसिल कार्यालय येथे नायब तहसिलदार तामसकर साहेब व पोलिस स्टेशन येथे तालुका अध्यक्ष राजुभाऊ गायकवाड यांनी व हिमायतनगर तालुक्यातील लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यांनी निवेदन दिले आहे.या वेळी तालुकाध्यक्ष राजुभाऊ गायकवाड,उपाध्यक्ष प्रशांत महाजन,सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष तानाजी गाडेकर, तालुका सचिव दयानंद वाघमारे, विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रदिप तपासकर, लहुजी शक्ती सेनेचे कट्टर समर्थक अभिजित बनसोडे,कामारी शाखा अध्यक्ष निरंजन कांबळे,विकास कांबळे, यावेळी उपस्थित होते.